Snake Video Viral : बेडूक आणि साप हे एकमेकांचे पक्के वैरी मानले जातात. साप बेडकाला (Frog and snake video) खातो हे आपणा सर्वांना माहितीच आहे. म्हणून बेडूक सापापासून दूरच राहण्याचा प्रयत्न करतो. पण एका बेडकाने (Frog video) अशी हिंमत दाखवली आहे. की तुम्ही व्हिडिओ पाहून थक्क व्हाल, चक्क बेडकाने सापाच्या (snake video) पाठीवर बसून जंगलाची स्वारी केली आहे. सापावर राइड करणाऱ्या या बेडकाचा (Frog ride on snake) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या शत्रूशी पंगा कधीच घेऊन नये, असं म्हणतात. पण बेडकाने आपल्या कट्टर शत्रूशी सापाशी पंगा घेण्याचं धाडस केलं. महाकाय सापाच्या शरीरावर बसून जंगलाची सफारी करताना दिसत आहे. 



व्हिडीओत पाहू शकता, पिवळ्या रंगाचा हा महाकाय साप (snake video)  आहे. तो गवतातून हळूहळू सरपटत पुढे जात आहे. त्यावर बेडूक बसला आहे आणि बेडूक अगदी मस्त त्या सापावर घसरताना दिसतं आहे. जणू सापावर तो राइडच करत आहे. आता आपण कशावर राइड करतो आहोत हे या बेडकाला माहिती आहे की नाही हे तर माहिती नाही.


वाचा : IPL 2023 संदर्भात मोठी बातमी; दोन दिग्गज खेळाडू स्पर्धेला मुकणार? समोर आली महत्त्वाची माहिती 


हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर fnybitch नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 17 हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. शिवाय अनेकांनी यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. 


बेडकाला कदाचित माहित नसेल की मृत्यूच्या दारात जात असावा. दर दुसरीकडे एक ज्या सापावरून हा बेडूक जातो आहे, त्यालादेखील आपल्या पाठीवर काहीतरी आहे हे साधं जाणवतही नाही का? की या सापात आणि बेडकात मैत्री असावी? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया जरूर द्या.