Viral Video : इंटरनेटच्या युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. विशेषत: तरुण पिढीमध्ये रिल्स (Reels) बनवून ते सोशल मीडियावर शेअर करत प्रसिद्धी मिळवण्याचं फॅड आहे. सोशल मीडियावर आपल्या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट मिळवण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. अनेकवेळा तर जीवाची पर्वाही करत नाहीत. सोशल मीडियावर (Social Media) दररोज असे अनेक व्हिडीओ शेअर होत असतात. यातले काही व्हि़डिओ विचार करायला लावणारे असतात तर काही व्हिडिओ केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीला खायला आवडतो साबण
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक मुलगी चक्क आंघोळीसाठी वापरण्यात येणारा साबण (Soap) खाताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ही मुलगी या व्हिडीओवर अनेक लाईक आणि कमेंट्सही आल्या आहेत. व्हिडीओला लाख व्ह्यूज मिळाले आहेत.


काय आहे व्हिडिओत
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक मुलगी आरशासमोर उभी असलेली दिसतेय. तिच्या एका हातात साबण आणि दुसऱ्या हातात हँडवाशची बाटली आहे. सुरुवातीला साबण आणि हँडवॉशचा वास घेते आणि त्यानंतर त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. साबण आणि हँडवॉशचा वास घेतल्यानतंर ती मुलगी थेट साबण खायला सुरुवात करते. काही मिनिटातच तीने संपूर्ण साबण खाऊन टाकला. पण त्यानंतरही तिला काहीच वाटलं नाही. उलट साबण खाऊन ती खुश दिसतेय. मला साबण खायला आवडतो, असं ती व्हिडीओत पाहून सांगतानाही दिसतेय.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Suchi Dutta (@21b_kolkata)


काय आहे व्हिडिओमागचं सत्य?
एखादी व्यक्ती साबण कसा खाऊ शकते असा प्रश्न हा व्हिडीओ पाहाणाऱ्यांना पडला आहे. पण जेव्हा या व्हिडीओमागचं सत्य लोकांना कळतं तेव्हा मात्र लोकांना हसू आवरत नाही. हा व्हिडीओ 21b_kolkata नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला एक कॅप्शन देण्यात आलं असून यात 'मला साबण खायला आवडतो' असं लिहिलंय. वास्तविक हा साबण नसून साबणासारखा दिसणार केक आहे. व्हिडीओच्या शेवटी ती मुलगी चाकूने साबण कापते. त्यावेळी साबणाच्या आत केकचा बेसही दिसून येतो. खूप कल्पकतेने या मुलीने लोकांना प्रँक केलं आहे.