मुंबई : काहीही म्हणा पण आपल्यापैकी कोणाला रस्त्यावर भांडण बघायला आवडत नाही? आपल्याला कितीही घाई असली तरी आपण 2 मिनिटं तरी त्यासाठी वेळ काढतो आणि काय झालं हे माहित करुन घेतो. लोकांचा मुड कसा ही असला तरी भांडण पाहिल्यानंतर मात्र तो लगेच बदलतो. कारण हे भांडण कितीही मोठं किंवा गंभीर असलं तरी आपल्याला अशी भांडणं मनोरंजक वाटतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण शक्य तो कोणत्या ना कोणत्या कारणासाठी मुलांना रस्त्यावर भांडताना पाहातो. परंतु मुलींची भांडण पाहण्यासाठी लोकांची ही गर्दी होते, कारण मुलींची भांडणं लोकांना जास्त मनोरंजक वाटतात.


मुली कुणापेक्षाही भांडणात कमी नाहीत. जेव्हा त्यांना राग येतो, तेव्हा त्या काहीही बोलायला सुरवात करतात आणि अगदी भांडण वाढलं, तर मुली एकमेकांना लाथा मारायला आणि केस खेचायला देखील कमी करत नाही.


असाच मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अचानक दोन मुलींनी एका मुलीवर हल्ला केला आणि तिला मारु लागल्या, त्यानंतर त्यांना प्रत्यूतर देत दुसरी मुलगी हाताने देखील मारु लागली. त्यानंतर तिने त्यांना लाथेने देखील मारले. त्यांचे हे भांडण इतकं वाढलं की, त्या एकमेकींचे केस देखील ओढू लागल्या.


हे भांडण इतके वाढले की, त्यामुली काही कोणाचं ऐकायला तयार नाहीत आणि कोणी ते भांडण थांबवण्याची हिंमत देखील करत नाहीत. एक मुलगी हे भांडण सोडवण्यासाठी पुढे आली परंतु तिला देखील हे भांडण सोडवण जमलं नाही.


यांचे भांडण त्यांनी पुढे कसे सोडवले हे त्यांनाच माहित. परंतु हा व्हिडीओ लोकं अगदी मनापासून पाहात आहेत आणि हा व्हिडीओ एकमेकांना शेअर देखील करत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


satu_saini90 नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या व्हिडीओला लोकं इतके पसंत करत आहेत की, हजारो लोक त्यावर कमेंट्स करण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाहीत.