Viral Reel : सोशल मीडियावर रिल्स बनवण्याच्या नादात उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) पत्नी-पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता सोशल मीडियार आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत नदीच्या किनारी व्हिडिओ बनवण्याच्या नादात मुलगी पाय घसरुन नदीत पडली. सुदैवाने थोडक्यात बचावली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सने रिल्स बनवणाऱ्या मुलीला चांगलंच ट्रोल केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल व्हिडिओत


व्हायरल होणार हा व्हिडिओ हरिद्वारचा (Haridwar) असल्याचं सांगितलं जात आहे. गंगा घाटावर एक मुलगी गंगा घाटावर रिल्स बनवताना दिसत आहे. व्हिडिओच्या मागे हिंदी गाणंही ऐकायला येतंय. व्हिडिओत मुलगी महादेवाच्या पिंडीसमोर हात जोडून पाया पडत असल्याची अॅक्टिंग करताना दिसतेय. त्यानंतर पिंडीच्या बाजूला असलेल्या सुरक्षा रेलिंगवरुन चालताना दिसतेय. पण त्याचवेळी तिचा अंदाज चुकतो आणि ती थेट नदीत पडते. ही सर्व घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे. काही लोकं तिला वाचवण्यसाठी धावतात. पण मुलगी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाते. सुदैवाने काही अंतरावर सुरक्षेसाठी लावण्यात आलेले लोखंडी खांब तिच्या हाताला लागतात आणि ती ते खांब पकडते. त्यानंतर तिला पाण्यातून बाहेर काढलं जातं.


केवळ नशीब बलवत्तर म्हणून ती मुलगी वाचल्याचं या व्हिडिओत दिसतंय. शुभम शुक्ला नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्याने एक कॅप्शनही दिलं आहे. 'रिलची आवड असलेल्या या मुलीला भगवान महादेवाने चांगलीच शिक्षा देऊन वाचवलं, हा व्हिडिओ हरिद्वारमधल्या विष्णू घाटाजवळचा आहे. भगवान महादेवाला हिचं रिल बनवलं आवडलं नाही' असं कॅप्शनमध्ये या युजरने लिहिलं आहे.



या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही चांगलंच सुनावलं आहे. एका युजरने लिहिलंय प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोकं देवालाही सोडत नाहीत, अशा लोकांनावर कठोर कारवाई व्हायरला हवीय. तर एका युजरने देवासमोर हिंदी गाण्यांवर असे रिल्स बनवणं यांना शोभा देतं का असं म्हटलं आहे.