Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात आणि ते आपलं लक्ष वेधतात. काही व्हिडीओ हे खूप धक्कादायक असतात तर काही मजेशीर असतात. तर सोशल मीडियावरील काही व्हिडीओ पाहून भावूक व्हायला होतं. एखादा व्यक्तीचा व्हिडीओ हा असंख्य यूजर्सच्या डोळ्यात पाणी आणतो. असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तो पाहून यूजर्सचे डोळे पाणवले आहेत. 


कष्टाला पर्याय नाही 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा 15 सेकंदाचा व्हिडीओमध्ये एक मजूरचा पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट करताना दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका बस स्टॉपवर एक कामगार आपल्या डोक्यावर घेऊन बसच्या वर ठेवत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्स आर्श्चय व्यक्त करत आहेत. पण अनेक लोकांच्या समोर कष्टाला पर्याय नसतो म्हणून यूजर्स त्या कामगाराला सलाम करत आहेत. 


व्हिडीओ तुफान व्हायरल 


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. @umda_panktiyan नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ''लोकांना आपली मेहनत हे संघर्ष वाटतं आणि दुसऱ्यांचा तमाशा दिसतो,'' असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आला आहे. तर हा व्हिडीओ 29 जुलैला पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 45 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 3 हजारांपेक्षा अधिक लोकांनी तो लाईक केला आहे.