मुंबई : लोकं सोशल मीडियावर काही ना काही मजेदार व्हिडीओ शेअर करत असतात. यातील काही व्हिडीओ असे असतात की, ते लोकांना खुप हसवतात. आज एक असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडेल आणि शेवटपर्यंत तुम्ही त्या व्हिडीओला पाहून हाच विचार कराल की पुढे आणखी काय घडणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या लोकांना बाईक धक्क्यावरुन एका बोटीत न्यायची आहे. परंतु ती बोट धक्क्यापासून फार लांब उभी असल्याने लोकं तो धक्का आणि बोटीच्यामध्ये लाकडाची फळी ठेवतात आणि बाईक एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर घेऊन जातात.


परंतु ही बाईक ज्या फळीवरुन घेऊन जात आहे, ती फळी फारच अरुंद आणि कमकुवत आहे. ज्यामुळे तो व्यक्ती बाईक घेऊन जाताना नक्की काय होतं हे तुम्ही नक्कीच तुमचा जिव मुठीत धरुन पहाल आणि हा व्हिडीओ तुमच्या अंगावर काटा उभा करु शकतो. परंतु अखेर इतकी मेहनत करुन देखील ती बाईक पाण्यात पडतेच.


हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी जोरदार प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. व्हिडीओ पाहिल्यानंतर, एका वापरकर्त्याने लिहिले की, हा व्हिडीओ जरी हास्यास्पद वाटत असला, तरी त्याच्या हृदयाची स्थिती विचारा ज्याची बाईक एका क्षणात पाण्यात बुडाली आहे.


त्याचवेळी, दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, हा व्हिडीओ आपल्या सर्वांसाठी धडा आहे. तुम्ही असा मूर्खपणा करणे टाळा आणि स्वतःला नुकसानीपासून वाचवा.



renné nésa नावाच्या वापरकर्त्याने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे. ही बातमी करेपर्यंत याला 4 लाख वेळा पाहिले गेले आहे. त्याच वेळी, 12 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला पसंत केले आहे. तर याला 6 हजारपेक्षा जास्त वेळा रिट्विट केले गेले आहे.