असं धाडस नकोच! रिल्सच्या नादात ट्रॅकखाली झोपला, वरुन धडधडणारी रेल्वे गेली आणि... Video पाहून थरकाप उडेल
Railway Track: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजची तरुण पिढी कोणत्याही टोकाला जाऊ शकते. रिलसाठी जीवावर उदार होऊन स्टंट केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Railway Track Reels : सोशल मीडियावर (Social Media) दररोज कोणते ना कोणते व्हिडिओ शेअर होत असतात. सध्याच्या तरुण पिढीत रिल्स (Reels) बनवण्याची फॅशन आहे. काहीतरी वेगळा कंटेन्ट देण्यासाठी तरुणाई कोणत्याही थराला जातात. केवळ लाईक्स (like) आणि कमेंट (Comments) मिळवण्यासाठी जीवावर उदार होऊन रिल्स बनवले जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडेल. या व्हिडिओवर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक मुलगा रेल्वे ट्रॅकच्या (Shocking Video) पटरीखाली झोपलेला दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला रुळावरुन एक ट्रेन वेगाने येताना दिसत आहे. त्यानंतर कॅमेरा फिरवला असता रुळाखाली एक मुलगा झोपलेला दिसत आहे. रेल्वे वेगाने त्याच्यावरुन जातेय. तो मुलगा डोक्याखाली हात ठेवून आरामत झोपलेला दिसत आहे. हा व्हिडिओ अभिषेक नारेडा नावाच्या युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून हजारो कमेंट् आल्या आहेत.
युजरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, व्हायरल व्हिडिओ कुठला आहे, माहित नाही, पण ज्या पद्धतीने हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे, ते चूकीचं आहे. या मुलाविरोधात रेल्वे पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे. पोलिसांनी इतकी कठोर कारवाई करावी की भविष्यात असं धाडस कोणी करणार नाही. या युजरने हा व्हिडिओ रेल्व पोलीस (Railway Police), केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाला टॅग केला आहे. व्हिडिओत निळं शर्ट घातलेला एक मुलगा दोन पटरींच्या मध्ये झोपलेला दिसत आहे. काही क्षणातच एक वेगाने येणारी रेल्वे त्याच्यावरुन जाताना दिसतेय.
इतक्या वेगाने ट्रेन जात असतानाही ही पटरींच्यामध्ये तो व्यकती आरामात झोपलेला दिसत आहे. त्याच्या एका साथीदाराने ही संपूर्ण घटना कॅमेरात रेकॉर्डिंग केली आहे. या व्हिडिओला सहा लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काही लोकांनी या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटलंय, भारतीय रेल्वे कायद्यानुसार या व्यक्तीला तुरुंगात पाठवलं पाहिजे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलंय, अशा प्रकारेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणं चुकीचं आहे. भविष्यात असे व्हिडिओ कोणी बनवू नयेत यासाठी कठोर नियम बनवण्याची गरज असल्याचं काही जणांनी म्हटंलय.