मुंबई : देशभरात कोरोनाचा व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. ऑक्सिजन आणि हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत अशी वेळ आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येक जण झगडत आहे. कठीण प्रसंगात एका श्वासाकरता लोकांची धावाधाव सुरू आहे. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती व्हेंटिलेटरवर असून चक्क तंबाखू मळताना दिसत आहे. 


व्हायरल झाला व्हिडिओ 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ अतिशय थक्क करणारा आहे. एक व्यक्ती चक्क व्हेंटिलेटवर आहे. जगण्यासाठी त्याला ऑक्सिजन पाइपची मदत घ्यावी लागत आहे. असं असताना हा माणूस चक्क हातात तंबाखू मळताना दिसत आहे. 


हा व्हिडिओ जवळून पाहिल्यावर कळतंय की, त्याच्या पायाजवळ एक महिला बसली आहे. माणसाचा या हालचाली बघून ती तेथील नर्सला सगळा प्रकार दाखवत आहे. त्यांनी हा प्रकार लगेच रेकॉर्ड केला आहे. रूग्णाच्या या अजब प्रकाराला रेकॉर्ड केलं आहे. 


आयपीएस ऑफिसर रूपिन शर्मा यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. छोड़ेंगे न तेरा साथ... मरते दम तक ..हे गाणं बॅकग्राऊंडला ऐकू येत आहे.