ट्रेनने प्रवास करताना ही चूक कधीही करु नका, या माणसासोबत काय घडलं? पाहा व्हिडीओ
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ रेल्वे स्टेशनचा आहे.
मुंबई : सोशल मीडियाच्या दुनियेत तुम्ही जितके कंटेन्ट पाहाल तेवढे कमीच आहे. हे कंटेन्ट इतके मनोरंजक असतात की, तुम्ही त्याला पाहण्यापासून आणि मोबाईलची स्क्रिन स्क्रोल करण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाही. इथे एकापेक्षा एक व्हिडीओ समोर येतात आणि ते इंटरनेटवर वेगाने व्हायरल होतात. जे आपले मनोरंजन करतात तर काही व्हिडीओ आपल्यासमोर उदाहरण ठेवतात. ज्याद्वारे आपण बरंच काही शिकू शकतो. चोरीचे अनेक किस्से तुम्ही ऐकले किंवा पाहिले देखील असतील. सोशल मीडियावरती आपल्याला असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यामुळे चोर कशा प्रकारे हुशारीने चोरी करतात हे आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्याला अशी चुक करण्यापासून सावध करते.
बस स्टँड, मार्केट, शॉपिंग मॉल किंवा रेल्वे स्टेशन हा ठिकाण गर्दीचं ठिकाण असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात चोरी होते. अनेकांनी अशा घटना घडताना आपल्या डोळ्यासमोर देखील पाहिले असेल.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती स्टेशनवर दुसऱ्या व्यक्तीच्या हातातून फोन हिसकावून घेतो. हा व्यक्ती ज्या हुशारीनं फोन खेचून घेतो. जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ रेल्वे स्टेशनचा आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेन स्टेशनवरती थांबली आहे आणि एक व्यक्ती ट्रेनच्या दारात उभी राहून फोनवर बोलत असल्याचे दिसत आहे. त्या व्यक्तीभोवती अनेक लोक फिरत असतात. मग काही वेळाने जेव्हा ट्रेन सुरू होणार असते तेव्हा चोरी करणारी व्यक्ती ट्रेनमध्ये चढते आणि ट्रेनचा वेग वाढताच ती व्यक्ती ट्रेनमधून उतरते.
हे सगळं दृश्य पाहून तुम्हाला सगळं नॉर्मल असल्यासारखे वाटते. परंतु तसे काही नाही. हा ट्रेनमधून उतरलेला व्यक्ती फोनवर बोलत असलेली व्यक्ती जवळ येताच, त्याच्या हातातून फोन खेचतो आणि पळू लागतो. प्लॅटफॉर्म खाली असल्यामुळे त्या व्यक्तीला पकडायला कोणी पुढे येत नाही. ज्यानंतर हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवरील दिवाळावर चढून उडी मारुन निघून जातो.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. haq_se_engineers नावाच्या पेजवर तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता.
हा व्हिडीओ आतापर्यंत 60 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही शेअर केल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करता एका यूजरने लिहिले – हे अजिबात अपेक्षित नव्हते. दुसर्या यूजरने लिहिले - भाऊ, या व्यक्तीने गेमच केला. तर तिसर्या युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले - याला म्हणतात संधीचा फायदा घेणे. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक हसणारे इमोजीही शेअर करत आहेत.
तुम्ही हा व्हिडीओ पाहून सावध व्हा आणि अशी चूक कधीही करु नका.