मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकजण सध्या सोशल मीडियावरती ऍक्टीव्ह असतो. आपण सोशल मीडियाचा वापर आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यासाठी, काही ना काही व्हिडीओ, फोटो बघण्यासाठी करतो. सोशल मीडियावरती आपल्याला अशा मनोरंजक गोष्टी पाहायला मिळताता की ते पाहाण्यात आपला वेळ कसा निघून जातो हे देखील आपल्याल कळत नाही. येथे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे म्हणजेच फनी, जेवणाचे, फिरण्याचे, सायन्स आणि टेक्नोलॉजी असे अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावरती जो व्हिडीओ व्हयरल होत आहे त्याला मात्र तोडं नाही. कारण यामध्ये कुत्र्यानं जी चतुराई दाखवली आहे, हे पाहून कुत्रा असं काही करु शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही.


कुत्रा हा पाळीव प्राण्यांपैकी एक आहे. बऱ्याच लोकांना कुत्रा पाळण्याची इच्छा असते, ज्यामुळे ते आपल्या घरी कुत्रा पाळतात, त्याची लहान बाळाप्रमाणे काळजी देखील घेतात. काही कुत्रे हे खूप मायाळू असताता, तर काही कुत्रे हे त्याच्या मालकांव्यतीरिक्त इतरांसाठी घातक असतात. म्हणून या अशा कुत्र्यांना त्यांचे मालक पट्टयाने बांधून ठेवतात.


परंतु कुत्रा हा हुशार प्राण्यांपैकी एक आहे, तो माणसांकडून अनेक गोष्टी शिकतो आणि त्याला अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका कुत्र्याला खांब्याला बांधून ठेवली आहे, जे पाहून एक तरुण त्या कुत्र्याला चिडवू लागतो. या तरुणाला वाटते की, कुत्रा बांधलेला असल्यामुळे तो माझं काहीही करु शकणार नाही. परंतु पुढच्या क्षणी तो कुत्रा या तरुणाच्या हृदयाचा ठोका चूकवतो, कारण हा कुत्रा इतक हुशार आहे की, त्याने खांब्याला बांधलेला त्याच्या पट्टा स्वत:च काढला आणि त्या तरुणाकडे धाव घेतली.



या व्हिडीमध्ये पुढे काय घडलं हे काही समोर आलेलं नाही. परंतु तुम्ही कुत्र्याचा स्वॅग पाहून हा विचार करुच शकता की, त्याने या तरुणासोबत पुढे काय केलं असावं. 


हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर official.rajput32 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी त्याला आपल्या मित्रांसोबत शेअर देखील केला आहे. तर काही यूजर्सने यावर कमेंट करुन लिहिले की, आता हा व्यक्ती कोणत्याही कुत्र्याची आयुष्यात कधी कळ काढणार नाही, तर आणखी एका युजरनं लिहिलं की, कुत्रे हे हुशार असताता आणि ते काहीही करु शकतात, त्यामुळे सांभाळून.