Manjulika & Money Hiest Viral Video Fact Check  : सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळविण्यासाठी, व्हायरल, लाइक्स आणि पैशांसाठी नेटकरी वेगवेगळे रील्स तयार करतात. ते सोशल मीडियावर व्हायरल पण होतात. काही यूजर्स एका क्षणात प्रकाशझोतात येतात. पण काहींना ते शक्य होतं नाही. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आणि पैशांसाठी तरुण पिढी एकही जागा सोडत नाही आहेत. बघावं तिकडे ही तरुण पिढी रील्स काढताना दिसतात. गेल्या काही दिवसांमध्ये मेट्रोमधील व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. त्यातील मंगळवारी अचानक Manjulika आणि Money Hiest चे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमागील सत्य समोर आलं आहे. 


हे आहे व्हिडीओमागील सत्य (Fact Check)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मेट्रोतील प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. अनेकांनी अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी रील्स करण्यावर आक्षेप व्यक्त केला. हे दोन व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर नोएडा मेट्रो रेल कॉर्पोरेशन (NMRC) ने देखील चौकशीची मागणी केली. त्यानंतर NMRC अधिकाऱ्यांनी सांगितले की हे मेट्रोतील व्हिडीओ एका शूटिंगचा भाग होते.



त्यापुढे म्हणाल्या की, या शूटिंगचा व्हिडिओ मॉर्फ करून एडिट करण्यात आला आहे. NMRC कॉरिडॉरमधील बोट एअर डोप्ससाठी मेसर्स क्रिएटिव्ह प्रोडक्शनद्वारे ही जाहिरात फिल्म शूट करण्यात आली.