Viral Video: चारही बाजूने पाण्याचा रौद्र प्रवाह आणि मधोमध गाडीसह अडकलेली महिला; पुढे काय झालं ते पाहा?
Viral Video: हरियाणाच्या (Haryana) पंचकूलामधील (Panchkula) खडक मंगोली (Khadak Mangoli) येथे नदीला (River) पूर आल्यामुळे एक कार वाहून गेली. यावेळी कारमध्ये असलेल्या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे. या बचावकार्याचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Viral Video: पावसाने अनेक राज्यांमध्ये हजेरी लावली आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली असून काही ठिकाणी नद्यांना पूर आलं आहे. यामुळे लोकांची धावपळ असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीतही झालं आहे. यादरम्यान हरियाणामधील (Haryana) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडीओत एक कार नदीच्या प्रवाहात वाहून जाताना दिसत आहे. यावेळी कारमध्ये असलेल्या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे.
हरियाणाच्या पंचकुला येथे एक गाडी नदीत वाहून गेली आहे. गाडीत असणाऱ्या महिलेला पंचकुलाच्या सेक्टर 6 मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. क्रेनच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होता. पावसामुळे नदीला अचानक पूर आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे.
महिला पंचकुलाच्या खडक मंगोली येथे पाया पडण्यासाठी आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची आईदेखील तिच्यासोबत होती. महिलेने नदीच्या किनारी गाडी उभी केली होती. याचवेळी अचानक पाण्याचा वेग वाढला आणि गाडी चारही बाजूने पाण्यात अडकली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावपथक घटनास्थळी दाखल झालं होतं. यानंतर स्थानिकांनीही पाण्यात उड्या घेतल्या आणि रशीच्या सहाय्याने महिला आणि तिची आईची सुटका केली. नदीने रौद्ररुप धारण केलेलं असतानाही स्थानिक पाण्यात त्यांच्या मदतीसाठी उतरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
दरम्यान महिलेची सुटका केल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच मदतीसाठी धाव घेणाऱ्या स्थानिकांच्या शौर्याचं कौतुक केलं जात आहे.