VIDEO : कारवर लावले 1 लाखाहून अधिक फटाके, पेटवल्यानंतर पाहा काय झाले गाडीचे हाल
कारवर 1 लाखाहून अधिक फटाके पेटवले तर काय होतं. पाहा video
मुंबई : कारवर 1 लाखाहून अधिक फटाके लावले तर काय होऊ शकतं? याची कल्पना कधी तुम्ही केली आहे का? असाच एक प्रयोग प्रसिद्ध यूट्यूबर अमित शर्मा याने केला आहे. कारवर त्याने 1 लाखांहून अधिक फटाके फोडले, त्यानंतर कारचं काय झालं. हे पाहण्यासाठी तुम्हाला खालचा व्हिडिओ पाहावा लागेल.
राजस्थानमधील यूट्यूबर अमित शर्मा याने दिवाळीच्या आधी त्याच्या क्रेझी एक्सवायझेड या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केलाय. यामध्ये त्याने कारवर आधी फटाके लावले आणि मग नंतर पेटवून पळून गेले.
कारच्या वरच्या बाजूला टेपच्या साहाय्याने फटाके चिकटवण्यात आले. कारवर फटाके फोडल्यानंतर काय होते? हे पाहण्यासाठी त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला. अमितने त्याच्या साथीदारांसह कारच्या वर 5,000, 10,000 फटाक्यांच्या लडी लावल्या होत्या. फक्त गाडीच्या खिडक्यांना फटाके लावले नव्हते.
एक लाख फटाके कसे पेटवले गेले हे पाहण्यासाठी ड्रोन कॅमेरे, गो-प्रो कॅमेरे आणि इतर कॅमेरे अमित शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक अँगलने लावले होते, जेणेकरून संपूर्ण दृश्य रेकॉर्ड करता येईल. फटाक्यांची आतषबाजी होताच बराच वेळ परिसर फटाक्यांच्या आवाजाने दणाणला.
फटाके फुटल्यानंतर कारच्या सर्व खिडक्या पांढर्या शुभ्र दिसत होत्या. गाडीचे बोनेट वाजताना दिसत असले तरी त्यात मोठे नुकसान झालेले नाही. कारची बॅटरी पूर्णपणे शाबूत होती, कारच्या पेंटवर 'फुगे' तयार झाले होते.
सर्व फटाके फोडल्यानंतर अमित शर्मा यांनीही गाडी चालवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला गाडी हलली नाही, पण नंतर काही वेळाने पुढे गेली. मात्र नंतर ती पुन्हा बंद झाली.