लग्न पार पडताच, नववधू उठली आणि नवरदेवाला मारतच सुटली, पाहा व्हायरल व्हिडीओ
जवळ-जवळ सगळ्याच लग्नात असं काहीतरी घडतं ज्यामुळे उपस्थीत सगळे जण त्याचा आनंद घेतात.
मुंबई : सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर आपल्याला सगळ्या गोष्टीची माहिती मिळते. सोशल मीडियामुळे आपल्याला राजकारणापासून ते अगदी बॉलीवूडपर्यंत सगळ्याच गोष्टीची माहिती मिळते. सोशल मीडियावर आपले मनोरंजन देखील होते, त्याचबरोबोर सोशल मीडिया हे असे प्लॅटफॉर्म देखील आहे जेथे आपल्याला नवीन नवीन मित्र देखील भेटतात. ज्यामुळे सगळेच तरुण मंडळी सध्या सोशल मीडियावर असल्याचे आपल्याला पाहायला मिळाते.
तसेस सध्या लग्नाचा सिझन असल्यानेआपल्याला सोशल मीडियावर लग्नाचेच फोटो किंवा व्हिडीओ पाहायला मिळतात, हे व्हिडीओ खूपच मजेदार असतात. यांपैकी बहुतेक व्हिडीओ हे नववधू आणि नवरदेवाचे असतात.
जवळ-जवळ सगळ्याच लग्नात असं काहीतरी घडतं ज्यामुळे उपस्थीत सगळे जण त्याचा आनंद घेतात आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातुन बहुतांश लोकं असे व्हिडीओ शेअर करत असतात.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये नववधू नवरदेवाला रागाने मारत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, वधू अशी का वागली असावी. ज्या लोकांचं येत्या काळात लग्न होणार आहे, ते लोक हा व्हिडिओ पाहून घाबरून जाऊ शकतात.
व्हायरल व्हिडीओ क्लिप बघून असे वाटते की, हा व्हिडीओ वधूला निरोप देण्याच्या कार्यक्रमामधील आहे.
व्हिडीओमध्ये वधू आणि वर एका गाडीत बसलेले दिसत आहेत. अचानक वधूला काहीतरी होते आणि ती नवरदेवावर हल्लाबोल करते. ती नवरदेवाची कॉलर पकडून त्याच्या कानाखाली मारु लागते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे आणि लोकं हा विचार करत आहेत की, नवरीला नक्की काय झालं असावे बरं? बऱ्याच लोकांना असे वाटत आहे की, तिच्यावर कदाचित भूत बसले असावे, ज्यामुळे ती अशी विचित्र वागू लागली आहे. परंतु ही वधू नवरदेवावर इतकी का, रागावली याबद्दल कोणतीही माहिती किंवा कारण समोर आलेलं नाही.
संतप्त वधूचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर खूप ट्रेंड करत आहे. बातमी लिहीपर्यंत हा व्हिडीओ जवळपास 3.91 लाख वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, वापरकर्ते यावर सतत आपलं मतं देत आहेत आणि नवरी इतकी का रागवली असावी याबद्दल सुचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
एका यूजरने कमेंट केली की, 'मला या मुलासाठी खूप वाईट वाटत आहे. त्याचे उर्वरित आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे.' तर बहुतेक यूजर, 'वधूला अचानक काय झाले? ती नवरदेवाला इतके का मारत आहे?' असा प्रश्न विचारत आहेत.