पठ्ठ्या चक्क झाडूने बॅडमिंटन खेळला; VIDEO जबरदस्त व्हायरल
एक व्यक्ती बॅडमिंटन कोर्टात चक्क झाडूने खेळत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओला 3.5 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू आणि जवळपास 2 लाख लाईक्स मिळाले आहेत.
बॅडमिंटन खेळताना समोरच्या खेळाडूला चितपट करण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात. बॅडमिंटन हा तसा वेगवान खेळ असून, अचूक फटके मारण्यासाठी लक्ष विचलित न होता खेळावं लागतं. पण जर तुम्ही बॅडमिंटन खेळतात हातात रॅकेटच्या जाही एखादी काठी किंवा झाडू दिला तर? आता तुम्ही म्हणाला त्याच्याने कसं काय खेळायचं? पण जर तुम्ही सराव केला तर काहीही अशक्य नाही. दरम्यान असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती चक्क झाडूच्या मागच्या बाजूचा वापर करत बॅडमिंटन खेळत आहे. व्हिडीओला 3.5 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू आणि जवळपास 2 लाख लाईक्स मिळाले आहेत.
जतीन शर्मा यांनी गेल्या आठवड्यात हा व्हिडीओ शेअर केला आहे. "Badminton Lovers" नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत एक तरुणी आणि तरुण पारंपारिक पद्धतीने बॅडमिंटन खेळताना दिसत आहेत. यावेळी एक व्यक्ती झाडू मारत कोर्टवर येते आणि खेळात व्यत्यय आणते. पण यानंतर तिथे अनपेक्षित गोष्ट पाहायला मिळते.
ती व्यक्ती तरुणीला मागे सरकायला सांगते आणि हातातील झाडूने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात करते. हातात बॅडमिंटन रॅकेट नसतानाही झाडूने फकटे लगावत ही व्यक्ती सराईतपणे बॅडमिंटन खेळते. त्याने मारलेले फटके पाहून नेटकरी चाट पडले होते. इतकंच नाही तर तो पॉइंट मिळवण्यातही यशस्वी होतो.
हा व्हिडीओ शेअर केल्यापासून 3.5 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यू आणि जवळपास 2 लाख लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, कधीही कव्हर पाहून पुस्तकाबद्दल मत निर्माण करु नका.
खेळाडूचं कौशल्य पाहून अनेकजण अचंबित झाले आहेत. तसंच अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. एका युजरने लिहिलं आहे की, "रॅकेट्सचा शोध 1926 मध्ये लागला, त्याआधी लोक असंच खेळत होते". तर एकाने शटल आणि खेळाचा आदर करा अशी कमेंट केली आहे.
मी माझे पैसे रॅकेटवर वाया घालवले अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर एकाने नेक्स्ट जनरेशन बॅडमिंटन रॅकेट असल्याचं लिहिलं आहे.
काहींना मात्र व्हि़डीओवर टीका केली आहे. ""चांगले खेळत आहेत, पण कोणीतरी आधीच खेळत असताना तुम्ही कोर्टवर आक्रमण करू नये आणि या व्हिडिओची संकल्पना बकवास आहे," असं एका युजरने लिहिलं आहे. "चांगलं कौशल्य आहे, पण ते कुठेतरी दुसरीकडे दाखवा. तुम्ही खेळाचा अनादर करू नये असे आम्हाला वाटते," अशी कमेंट एका युजरने केली आहे.