सोशल मीडियावर एका श्वानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत श्वान रेल्वे स्थानकावर उभा असून, ट्रेन येताच धावू लागल्याचं दिसत आहे. हा श्वान धावत रेल्वे स्टेशनचं टोक गाठतो. यामागील कारण मात्र फारच भावूक करणारं आहे. ट्रेनचा चालक नेहमी या श्वानाला अन्न देत असल्याने तो त्याचीच वाट पाहत थांबलेला असतो. ट्रेन स्थानकात आल्यानंतर चालकाला पाहताच श्वान त्याच्या केबिनपर्यंत धावत सुटतो. श्वान आणि चालकातील मैत्रीच या व्हिडीओतून एकाप्रकारे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, करोडो लोकांनी पाहिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओच्या सुरुवातीला ट्रेनच्या चालकाने हातामध्ये जेवण ठेवलेलं दिसत आहे. यावेळी श्वान स्थानकावर अत्यंत शांतपणे उभा असल्याचं दिसत आहे. ट्रेन स्थानकात आल्यानंतर श्वान ट्रेनचा पाठलाग करत धावत सुटतो. ट्रेन थांबल्यानंतर चालक केबिनमधून बाहेर येतो आणि हातातील जेवणाची प्लेट श्वानासाठी ठेवतो. या व्हिडीओतून श्वान आणि ट्रेन चालकातील मैत्री दिसत आहे. यामुळेच श्वान जेव्हा कधी चालकाला पाहतो तेव्हा ट्रेनसोबत धावत सुटतो.  



व्हिडीओ शेअर करताना नेटकऱ्याने लिहिलं आहे की, "एका ट्रेन ड्रायव्हरने स्टेशनवर या श्वानाला खायला दिले. यानंतर श्वानाने ही ट्रेन लक्षात ठेवली. आता इंजिनियर त्याला नियमितपणे अन्न घेऊन येतो. त्याचा आनंद पाहण्यासारखा आहे. आपण प्रत्येक व्यक्तीला आनंद देऊ शकत नाही, परंतु दयाळूपणा नेहमीच आनंदी ठेवतो".


हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, नेटकरी भावूक झाले आहेत. हे दृश्य अनेकांच्या मनाला भिडले आहे. अनेक लोकांनी ड्रायव्हरच्या दयाळू स्वभावाची प्रशंसा केली आहे. "श्वानांना चांगले किंवा वाईट आठवते. त्यांना माहित आहे की कोण दयाळू आहे," असं एकजण म्हणाला आहे. "अद्भुत कथा. पोट भरलेले आनंदी पिल्लू," असं एका युजरने लिहिलं आहे.