उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) महाराजगंज जिल्ह्यात लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. विशेष म्हणजे लेखापालाने ज्या दिवशी लाच घेतली तो त्याचा नोकरीचा शेवटचा दिवस होता. नोकरीच्या शेवटच्या दिवशी 3 हजारांची लाच घेताना लेखापाल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पैसे देणारी व्यक्ती आपण रेशन विकून पैसे आणले आहेत, पैसे जमवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले असं सांगत असल्याचं व्हिडीओत ऐकू येत आहे. मात्र लेखापालला याचा काही फरक पडत नाही. तो हसत राहतो आणि पैसे मोजून लागतो. याप्रकरणी काँग्रेसने उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराजगंज येथील फरेंदा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. येथे लेखापाल आपल्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी लाच घेत होता. लेखापालच्या व्हिडीओच्या मुद्द्यावरुन उत्तर प्रदेश काँग्रेसने सरकारला लक्ष्य केलं आहे. काँग्रेसने एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं आहे की, "हे महाराजगंजमधील लेखापाल साहेब आहेत. पाहा कशा थाटात लाचखोरी करत आहेत. त्यांना काही फरक पडत नाही की, यांना दक्षिणा देण्यासाठी समोरील व्यक्तीने धान्य विकलं आहे की शेत. यांना फक्त आपला खिसा गरम करण्याशी मतलब आहे. यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असेल याला नकार देऊ शकत नाही. पण अशा प्रकारे भ्रष्टाचार करत सिस्टम कधीपर्यंत चालणार? यात काही सुधारणा होणार की नाही?".


ब्रिजमानगंज येथील रहिवासी राजन चौरसिया यांनी दीड वर्षांपूर्वी स्टेटस सर्टिफिकेट बनवण्यासाठी फरेंडा तहसीलमध्ये अर्ज केला होता. जेव्हा त्याची फाईल लेखापालाकडे पोहोचली तेव्हा त्याने अहवाल दाखल करण्यासाठी पैशांची मागणी सुरू केली. राजन तहसीलच्या फेऱ्या मारत राहिले, मात्र त्यांचे स्टेटस सर्टिफिकेट मिळालं नाही.


राजनने सांगितलं की, मी अकाउंटंटला त्याच्या मागणीनुसार थोडे थोडे करुन अनेक वेळा पैसे दिले. मात्र दरम्यान त्याने आणखी पाच हजार रुपयांची मागणी केली. 15 दिवसांपूर्वी मी माझ्या एका मित्रासह तहसीलला पोहोचलो होतो आणि 2900 रुपये लेखापालला दिले होते. यावेळी राजनच्या सहकाऱ्याने गुपचूप व्हिडिओ बनवला. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, आरोपी लेखापाल 30 नोव्हेंबरलाच निवृत्त झाला आहे.


स्टेटस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी वर्षभरापासून धावपळ सुरू असल्याचे पीडितने सांगितलं. आम्हाला अकाउंटंट अशोक मिश्रा विनाकारण येथून तेथून पळवत होते. जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत तुझे काम करणार नाही, असं तो सांगत होता. फाईल इथून गेली, तिकडे गेली, असा सतत आग्रह धरायचा. कधी 10 हजार तर कधी 5 हजार रुपये मागितले. शेवटी त्याने तीन हजार रुपये आणि त्याच्या एका मित्रालाही सोबत घेऊन गेला ज्याने व्हिडिओ बनवला. 15 दिवसांनी स्टेटस सर्टिफिकेट हातात आल्यावर हा व्हिडिओ व्हायरल झाला.