Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यातील काही व्हिडीओ हादरवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ गाझियाबादमधील (Ghaziabad mayhem Video) असल्याचं सांगितलं जातंय. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी गाझियाबादमधील मसुरी येथील कॉलेजमध्ये (Ghaziabad Collage Student)  शिकत असलेल्या बीबीए आणि बीसीए विद्यार्थ्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भर रस्त्यात राडा घातल्याचं दिसून आलं. यावेळी जे काही झालं ते पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.


नेमकं काय झालं?


पोरांची हाणामारी सुरू असताना अचानक एका गटातील विद्यार्थी पळून जातात. त्याचवेळी अचानक एक पांढऱ्या रंगाची गाडी त्याठिकाणी येते आणि काही विद्यार्थ्यांच्या अंगावर जाते. गाडीने मारलेली टक्कर एवढी जोरात होती की, एक विद्यार्थी हवेत उडून जमिनीवर आदळतो.


एवढंच नाही तर, कार चालक इतर विद्यार्थ्यांवर (car hit boys) गाडी चढवण्याचा देखील प्रयत्न करतो. त्याचवेळी काही विद्यार्थी दुसऱ्या बाजूला हाणामारी देखील करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच मसुरी पोलिसांनी प्रकरणाची पडताळणी केली आणि गाडी ताब्यात घेतली आहे. त्याचबरोबर केस देखील नोंदवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी देखील विद्यार्थ्यांना पकडताना दिसत आहे.


पोलिसांचं म्हणणं काय?


राडा घालणारे विद्यार्थी हे एका कॉलेजमध्ये शिकत होते. सिनियर आणि ज्युनियर विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्यानंतर ही घटना घडली. आम्ही काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय आणि त्यांची चौकशी सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलंय. त्याचबरोबर काही विद्यार्थी फरार असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.


पाहा व्हिडीओ-