मुंबई : सोशल मीडियावर आपल्या अनेक मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ इतके मजेशीर असतात की आपण त्याला वारंवार पाहातो आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करतो. तस सोशल मीडियावर आपल्याला असे देखील व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्या बऱ्याचदा आपल्यासोबत देखील घडलेलं असतं किंवा आपल्या आजूबाजूला तसं घडतं असतं, ज्यामुळे असे व्हिडीओ आपल्याला जास्त रिलेट होतात आणि आपल्याला ते पोट धरुन हसायला लावतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एवढेच नाही तर तो व्हिडीओ तुम्हाला हसायला लावेल.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की बेडवरती चादरीमध्ये एक मुलगी आहे आणि ही मुलगी चादरीच्या आता असं काही करंत असते, जे तिची आई पाहाते आणि तिच्या मुलीवरती भयंकर रागवते.


खरेतर बेडवरती चादरीत ही तरुणी मोबाईलवरती आपल्या आईपासून लपून बॉयफ्रेंडसोबत चॅटिंग करत असते, आई हळूच चादरीमध्ये शिरते आणि पाहते की ती चॅटवर कोणाला तरी आय लव्ह यू टूचा मेसेज पाठवत आहे. तिचे मेसेजेच पाहिल्यानंतर या आईची जी काही रिएक्शन असते ती पाहून तुम्हाला ही वाटेल की आता काही या तरुणीचं खरं नाही.



अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांनाही हा व्हिडिओ खूप आवडला आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर imkavy नावाच्या चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे.


बऱ्याच लोकांसोबत असा प्रकार घडला असल्यामुळे त्यांना हा व्हिडीओ फारच जवळचा वाटतो, ज्यामुळे तरुणाई याला मोठ्या प्रामाणावर शेअर आणि लाईक करत आहेत.