मुंबई : सोशल मीडियावर दररोज प्राण्यांशी संबंधित काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकवेळा तुम्हाला तुमचे हसू आवरता येत नाही. त्याचबरोबर असे काही व्हिडीओ आहेत, जे पाहून तुम्हीही हैराण व्हाल. सध्या सोशल मीडियावर भटक्या कुत्र्याशी संबंधित असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. खरंतर हा व्हिडीओ हिट आणि रनचा आहे. खरंतर हे प्रकरण खुप गंभीर असलं तरी, ते पाहून तुम्हाला असू आवरता येणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती कारपार्किंगमध्ये आपली कार पार्क करतो आणि रस्ता पार करण्यासाठी येतो. तो जेव्हा रस्त्यावर येतो, तेव्हा तो नेहमी प्रमाणे उजवीकडे आणि डावीकडे कोणतीही गाडी येत नाही ना हे पाहातो आणि रस्ता पार करण्यासाठी पुढे येतो. परंतु असं असून देखील तो व्यक्ती हिट अँन्ड रन केसला बळी पडतो.


खरंतर हा व्यक्ती गाडी तर पाहातो, परंतु तो रस्त्यावर धावणाऱ्या कुत्र्याकडे फारसे लक्ष देत नाही. परंतु त्याच कुत्र्याच्या धक्क्यामुळे हा व्यक्ती जोरात खाली पडतो. ज्यामुळे तो हिट आणि रन प्रकरणाला बळी पडतो.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हायरल व्हिडीओ फारच मनोरंजक आहे. जो सर्वांना पोट धरुन हसायला लावत आहे.


काही सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. इंस्टाग्रामवर एक दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडीओला 2 लाख 96 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याच वेळी, व्हिडीओ पाहिल्यानंतर, लोक सतत त्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.