मुंबई : सोशल मीडियावर आपल्या नेहमीच असं काहीतरी पाहायला मिळतं, जे आपलं मनोरंजन करतं. सोशल मीडियावरील प्रत्येक व्हिडीओ हा काही ना काही वेगळं सांगून जातो. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो JCB चा आहे. आपण सोशल मीडियावर JCBचे अनेक व्हिडीओ पाहिले. परंतु हा व्हिडीओ काही वेगळा आहे, जो सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण बऱ्याचदा JCB च्या सह्याने बांधकाम पाडताना, खोदकामात मदत करताना किंवा बांधकामात मदत करताना पाहिलं आहे. परंतु तुम्ही JCB चा वापर चोरी होताना पाहिला आहे का? 


हो तुम्ही बरोबर ऐकलं, तुम्हा ऐकायला विचित्र वाटत असलं तरी, JCB च्या मदतीने काही चोरांनी ATM मशिन चोरी केली आहे.


या घटनेचा व्हिडीओ ATM मधील CCTV मध्ये कैद झाला आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे, की  JCB कसं आत शिरतं आणि ते ATM मशिन उचलण्याचं प्रयत्न करतं.


सुरुवातीला हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की, JCB  नं ATM मशिन चोरनं कठीण आहे. परंतु काही सेकंदानंतर हा JCB तेथून ती मशिन उचलून निघून जातो.


ही घटना महाराष्ट्रातील असल्याचे सांगितले जात आहे, परंतु हे ठिकाण नक्की कुठलं आहे, हे समोर आलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएम मशिनमध्ये 27 लाख रुपये होते.



हा व्हिडीओ लोकांना खूपच आश्चर्यचकित करत आहेत. तर काही लोकांना हा व्हिडीओ पाहून देखील घडलेल्या घटनेवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.


सोशल मीडियावर तर अनेकांनी या चोरांच्या युक्तीचं कौतुक केलं आहे.  हा व्हिडीओ युट्यूब चॅनल Viral Stringer वर शेअर करण्यात आला आहे. याशिवाय हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर देखील शेअर केला गेला आहे.