Monkey Viral Video: हल्ली घराघरात प्राणी घुसण्याच्या घटना आपण पाहत असतो. कधी चित्ता तर कधी बिबट्या तर कधी कुत्रा, मांजरीपासून ते अगदी उंदीरांपर्यंत अनेक प्राणी हे घरात घुसतात आणि अक्षरक्ष: धुडगूस घालतात. यांचा प्रमुख वावर हा स्वयंपाक घरातच असतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात एक माकड चक्क स्वयंपाक घरात बसून बेसिन जवळ भांडी घासतो आहे. त्याचा हा क्यूट व्हिडीओ पाहून नेटकरीही घायाळ झाले आहे. परंतु त्याच्यावर अशाप्रकारे भांडी घासायची वेळ का आली असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे. या व्हिडीओ हे माकड अगदी मन लावून भांडी घासताना दिसते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की हे माकड सुरूवातीला भांडण्यांना पाणी घालून धूतो आहे. मग त्यानंतर साबण लावून व्यवस्थित घासतो आहे. त्यानंतर परत पाण्यात बुचकळून तो भांडी धुवून घेताना दिसतो आहे आणि मग तो भांडी टॉवेलनं स्वच्छ पुसतानाही दिसतो आहे. या व्हिडीओनं सध्या सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. या व्हिडीओवर अनेकजण सकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तर काही जण या व्हिडीओवर तूफान हसताना दिसत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी या माकडाची खिल्ली उडवली आहे. 


या व्हिडीओ पाहून अनेक जणांना या माकडाची दयाही येते आहे. तर अनेकजण त्यांच्या क्यूटनेसवर फिदा झाला आहे. हा व्हिडीओ IPS रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकांऊटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला सगळीकडून तूफान प्रतिसाद येतो आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून त्यावर अनेक भन्नाट प्रतिक्रियाही आल्या आहेत. 


माकड नक्की स्वयंपाक घरात आले तरी कसे आणि ते अचानक भांडी का घासू लागले याबद्दल प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिली आहेत. परंतु हा व्हिडीओ सगळ्यांनीच एन्जॉय केला आहे. या व्हिडीओवर आलेल्या प्रतिक्रियाही तुमचे चांगलेच मनोरंजन करतील. परंतु सध्या असाही प्रश्न पडतो आहे की माकड या प्राण्यानं घासलेल्या या भांड्यातून तुम्ही तुमचं जेवण कराल का? तुमची खाण्याची इच्छा होईल का? 



असे अनेक व्हिडीओज हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्राण्यांचे व्हिडीओज पाहायला चाहत्यांना खूपच आवडत असतात. त्यामुळे हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. या व्हिडीओला अनेकांनी शेअरही केलं आहे.