बेली डान्सरकडून शोक सभेत सलमान खानच्या गाण्यावर आयटम डान्स, व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का
एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावणे ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे. कारण कितीही झालं तरी, त्या व्यक्तीची जागा कोणीही भरून काढू शकत नाही.
मुंबई : एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावणे ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे. कारण कितीही झालं तरी, त्या व्यक्तीची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. सामान्यतः भारतात, हिंदू व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विविध धार्मिक विधी केले जातात. ज्यामध्ये बारावं, तेरावं, वर्षश्राद्धं असा सगाळ प्रकार असतो, ज्यामध्ये या गेलेल्या लोकांची आठवण काढली जाते. हे दिवस फारच भावनीक असतात. ज्यामुळे हे जग सोडून गेलेल्या लोकांच्या आठवणीत जेवण्याचा कार्यक्रम देखील ठेवला जातो, ज्यामध्ये मित्र आणि नातेवाईकांना देखील बोलावलं जातं.
अशाच एका श्रद्धांजली सभेचा एक व्हिडीओ सोशल सध्या मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. हो हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण या श्रद्धांजली सभेत एका महिलेला डान्स करण्यासाठी बोलावलं गोलं आहे. ज्यामधील ही ही महिला बेली डान्स करत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बेली डान्सर सलमान खानच्या वॉन्टेड गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे.
स्टेजवर एक वृद्ध पुरुष आणि स्त्रीचे फोटो तुम्ही पाहू शकता. हे दुश्य स्पष्ट करतात की त्यांच्यापैकी एकासाठी हा श्रद्धांजली मेळावा असावा.
श्रद्धांजली सभेच्या या स्टेजवर बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'ले ले मज ले' या लोकप्रिय गाण्यावर बेली डान्स करणारी एक महिला दिसत आहे. तर, एक व्हिडिओग्राफरही त्याच्या डान्सचे शूटिंग करत आहे.
एखाद्यच्या श्रद्धांजली सभेला असा डान्स पाहून सगळेच युजर्स हैरान झाले आहेत. इन्स्टाग्रामवर अनेक मीम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर अनेकांनी याला अपमानास्पद म्हटले, तर काहींनी त्याची खिल्ली उडवली. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर मिमोलॉजी नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे. आतापर्यंत सुमारे 50 हजार लोकांनी त्याला लाईक केले आहे, तर लाखो व्ह्यूज आले आहेत.