मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आपलं मनोरंजन करतात. परंतु त्यांपैकी खूप कमी व्हिडीओ असतात. जे आपल्याला मनापासून आवडतात आणि असे व्हिडीओ आपण आपल्या मित्रांना देखील शेअर करतो. सध्या सोशल मीडियावर देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील स्वत:ला त्याला शेअर करण्यापासून थांबवू शकणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलांचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर हेडलाइन बनतात. लहान मुलांचे असे काही व्हिडीओ असताता. जे आपल्या मनाला स्पर्श करुन जातात. मुलांचा स्वतःचा असा एक मूड असतो, त्यावेळी ते त्यांच्या मनाला हवे ते करतात.


एकतर लहान मुलांच्या मनात कधी काय येईल हे सांगणं तसं फार कमी आहे. त्यात त्यांनी जर का एकदी गोष्टी मनात ठरवली की संपलंच. मग तर ते कोणाचंच ऐकत नाहीत.


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये हा लहान मुलगा, ज्याला निट चालता ही येत नाही तो कोकरुजवळ पोहोचतो आणि त्याला टक्कर देण्याचा प्रयत्न करतो.


आपण हे बऱ्याच दा पाहिलं आहे की, लहान मुल त्यांच्या जवळ कोणी डोकं घेऊन गेलं की, त्यांना डोक्याने टक्कर देतात. तसेच प्राण्यांच्या बाबतीत देखील तसंच घडतं.


शेळ्या मेंढ्याचं देखील तसंच आहे. त्या देखील डोक्याला डोकं लावून भांडण करतात.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आता जर तुम्ही व्हिडीओ पाहिलात तर यामध्यो दोन्हीही लहान बाळ आहेत. पण एक माणसाचं आणि एक मेंढीचं आहे. हे दोघेही एकमेकांना टक्कर देतात. परंतु बाळाची ताकद कोकरु समोर कमी पडते आणि ते खाली पडतं. हा खरोखरच इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडीओंपैकी एक आहे.


memewalanews नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'ओ माय डिअर बेबी.' संपूर्ण सोशल मीडिया मुलाच्या या क्यूट स्टाइलने भारावून गेला आहे. व्हिडीओवर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.