नववधू-नवरदेव नाही, तर भर मंडपात काका-काकूंच्याच जुगलबंदीची रंगली चर्चा
आपल्या देशात लग्न हे एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतं. कारण त्यावेळेला कुटूंबातील लांबच्या आणि जवळच्या व्यक्ती एकत्र येतात.
मुंबई : आपल्या देशात लग्न हे एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतं. कारण त्यावेळेला कुटूंबातील लांबच्या आणि जवळच्या व्यक्ती एकत्र येतात. आनंदाने नाचतात, गातात, राबातात, मजा करतात. त्यामुळे नातेवाईकांशिवाय लग्नाला शोभा नाही. आपल्या देशातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोकं असल्याने लग्नाच्या पद्धती देखील वेगळ्या असतात.
काही लग्नात वरातीत डान्स करणाऱ्यांवर किंवा नवरा नवरीवर आनंदाने पैसे उडवले जातात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ असाच काहीसा आहे. यामध्ये तुम्हा पाहू शकता की, वधू आणि वर हार घालण्याच्या समारंभानंतर स्टेजवर बसले आहेत. त्यावेळेला त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांच्यावर पैसे उडवले जात आहे.
आपल्या सर्वांना माहित आहे की बहुतेक वेळा लग्नात लोक वधू -वरांना आशीर्वाद म्हणून पैसे देतात, परंतु अनेक वेळा काही लग्नात बऱ्याचदा घरातील वडिलांधाऱ्या मंडळींमध्ये वधू-वरावरती पैसे खर्च करण्याची स्पर्धा लागलेली असते. असाच एक व्हिडीओ आजकाल समोर आला आहे. ज्यात एक काका वधू आणि नवरदेवावर 10-10 च्या नोट उडवत आहे, पण नंतर एक महिला येते आणि काकांच्या बाजूला उभी राहून 100-100 च्या नोट्या उडवू लागते. ज्यामुळे तिथे उपस्थित काकां देखील डोळे मोठे करुन याकडे पाहातच राहिले.
काका आणि काकुंची ही जुगल बंदी पाहून नवरदेव आणि नववधूला त्यांचे हसू आवरत नाही आणि ते जोर जोरात हसू लागले.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यावर लोक मजेदार कमेंट्स देखील करत आहेत. एका वापरकर्त्याने सांगितले की आजची स्त्री प्रत्येकावर भारी आहे, तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, काकीच्या आगमनानंतर काकांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. हा मजेदार व्हिडिओ amar_siwach_official नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. ज्याला ही बातमी लिहीपर्यंत एक लाखाहून अधिक लाइक्स त्याला मिळाल्या आहेत.