मुंबई : सापाचे नाव ऐकल्यावर बरेच लोक घाबरून जातात. आता कल्पना करा जर तुमच्या समोर जर अचानक साप आला तर तुम्ही काय कराल? नक्कीच तुम्ही घाबरुन जाल. कारण आपल्या सगळ्यांना हे माहित आहे की, साप हा खूप विषारी प्राणी आहे, ज्याच्या विषामुळे लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो. परंतु या संबंधीत एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला साधा सुधा साप नाही, तर चक्कं कोब्रा सापाला आपल्या हाताने पकडते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे.



एका खोलीत किंग कोब्रा साप आणि ही महिला असते. सुरुवातीला ही महिला साप पकडण्यासाठी काठी वापरते. पण थोड्या वेळाने ती काठी फेकून देते. शेवटी महिला तिच्या हातांनी त्या सापाला पकडण्याचा निर्णय घेते. ती साप पकडण्यासाठी प्रयत्न करत असताना साप बऱ्याचदा तिच्या अंगावर जाण्याचा आणि तिला डसण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर ती धाडसाने कोब्राला पकडतेच.


जेव्हा ही महिला साप घेऊन त्या खोलीतून बाहेर निघत असते, तेव्हा मागे उभे असलेले लोकं, तेथून पळून जातात परंतु ही महिला त्या सापाला घेऊन बाहेर रस्त्यावर येते.


रस्त्यावर या सापाला आणल्यानंतर तो पुन्हा दुसऱ्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा ती महिला पुन्हा कोब्रा सापाला पकडण्याचा प्रयत्न करते. परंतु तो महिलेवर वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.


ही महिला इतकी हुशार आहे की, ती सापाला पुन्हा चकमा देण्याचा प्रयत्न करते आणि या सापाला पकडते. त्यानंतर ती त्या सापाला त्याच्या तोंडाकडून उचलले आणि त्याच्या दातांमधील विष काढण्याचा प्रयत्न करते आणि नंतर त्याला एका गोणीत भरते.  कोणाच्याही अंगावर काटा उभा राहिल असे हे दृष्य आहे.


या व्हिडीओवर काही लोकांनी असे कमेंट केले आहे की, मृत्यूसोबत खेळल्यामुळे या महिलेला देखील एखादं ऑलम्पीक मेडल देण्यात यावं. तर काही यूझर्सना या महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे.