Viral Video: अरे बापरे... 8 वर्षाच्या चिमुकलीने उचललं चक्क 60 किलोचं वजन; पाहा व्हिडिओ!
Viral Video of Arshiya Goswami: हरियाणा रहिवासी असलेल्या एका मुलीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडीओतील या मुलीचं नाव अर्शिया गोस्वामी असं आहे. अर्शिया गोस्वामी ही देशातली सर्वात कमी वयाची वेट लिफ्टर (Youngest Weightlifter) आहे.
Youngest Weightlifter Arshiya Goswami: भारतात टॅलेंटचं कमी नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. त्यामुळे खरं टॅलेंट देखील समोर येतं. अनेकांनी आयुष्य सोशल मीडियामुळे उजाळले आहेत. अशातच आता एक व्हिडिओ तुफान (Trending Video) शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली आहे. एका 8 वर्षाच्या लहान मुलीचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
हरियाणा रहिवासी असलेल्या एका मुलीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडीओतील या मुलीचं नाव अर्शिया गोस्वामी (Arshiya Goswami) असं आहे. अर्शिया गोस्वामी ही देशातली सर्वात कमी वयाची वेट लिफ्टर आहे. तब्बल 45 किलो वजन उचलून यंगेस्ट वेटलिफ्टर (Youngest Weightlifter) होण्याचा मान अर्शियाने कमावला होता.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये फक्त 8 वर्षाच्या अर्शिया गोस्वामी तब्बल 60 किलो वजन उचलताना दिसत आहे. तिचा हा सर्वोत्तम रेकॉर्ड असल्यातं बोललं जातंय. आर्शियाने वजन उचललं असलं तरी तिली पूर्णपणे लिफ्टिंग करता आलं नाही. भल्या भल्यांना न जमणारी गोष्ट आर्शियाने करून दाखवल्याने अनेकांनी तिचं कौतूक केलंय.
पाहा Video
मीराबाई चानूला (Mirabai Chanu) प्रेरणास्थान ठेऊन अर्शिया गोस्वामी चमकदार कामगिरी करत आहे. मला देशासाठी सुवर्णपदक जिंकायचं आहे, अशा भावना तिने एका मुलाखतीमध्ये व्यक्त केल्या होत्या. वेट लिफ्टिंगशिवाय आर्शिया पॉवरलिफ्टिंग (Powerlifting) आणि तायक्वांडो (Taekwondo) देखील करताना दिसते. अर्शियाचे वडील फिटनेस ट्रेनर आहेत, लहानपणापासून त्यांनी मुलीची आवड पाहता तिला ट्रेन केलं.
दरम्यान, सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video of Arshiya Goswami) होताना दिसत आहे. अनेकांनी तिच्या या फिटनेसचं (Arshiya Goswami Fitness) कौतूक करत तरुणाईला सुनावलं आहे. त्याचबरोबर तिच्या जिद्दीचं आणि मेहनतीचं कौतूक होताना दिसतंय.