Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) दररोज कोणते ना कोणते व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातले अनेक व्हिडिओ थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून स्वत:च्या डोक्यावर हात मारवासा वाटेल. देशात रस्ते अपघातात दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होतो. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभाग अनेक नियमही बनवतं. पण या नियमांकडे अनेकवेळा दुर्लक्ष केलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हायरल व्हिडिओत
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत वाहतूकीचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचं दिसतंय. ट्विटरवर (Twitter) हा व्हिडिओ नरेंद्र सिंह नावाच्या युजरने शेअर केलं आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती दुचाकी चालवताना दिसतोय. हैराण करणारी गोष्ट म्हणजे त्या दुचाकीवर घराच्या सामानासकट संपूर्ण कुटुंब बसलेलं दिसत आहे. 


घराचं सामान, कुत्रे आणि कुटुंब
हा व्हिडिओ पाहिल्यावर दुचाकीवर एकूण किती जण बसलेत याचा अंदाज येत नाही. पण प्रत्यक्षात यावर 5 मुलं, एक महिला आणि दुचाकी चालवणारी व्यक्ती असे सात जणं आहेत. दुचाकीच्या मागे काही सामान लटकवण्यात आलं आहे. त्या सामानावर एक बकरी आणि दुचाकीच्या एका बाजूला एक कुत्रा आणि दुचाकीच्या पुढे एक कुत्रा दिसत आहे. हे कमी कि काय एक कोंबडी देखील या सामानासोबत आहे.



सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
म्हणजेच एका दुचाकीवरुन सात माणसं आणि चार प्राणी प्रवास करताना दिसत आहेत. इतक्या साऱ्या ओझ्यासह दुचाकी चालवण्याचं कौशल्य पाहून या व्यक्तीचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. तर काहींनी हा व्हिडिओ पाहून डोक्यावर हात मारून घेतला आहे. काही असो हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.