प्रायव्हेट जॉबवाल्यांनो… महिन्याला 70,000 रुपये कमवतो हा पाणीपुरीवाला!
PaniPuri Viral Video: व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पाणीपुरी विक्रेत्याशी गप्पा मारत आहे.
PaniPuri Viral Video: पाणीपुरी हा आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय असतो. नुसत नाव काढलं तर तोंडाला पाणी सुटत आणि कधी एकदा पाणीपुरी खातो असं होऊन जातं. महिला वर्गात तर याचं विशेष आकर्षण आहे. त्यामुळे पाणीपुरी विक्रेतांच्या धंदा नेहमी जोरात असतो. असाच एका पाणीपुरीवाल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात त्याला त्याच्या कमाईबद्दल विचारले जात आहे. त्याने दिलेले उत्तर ऐकून नोकरदार वर्ग हैराण होऊ शकतो.
इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून आम्ही नोकरी सोडून पाणीपुरी विकायचा विचार करु लागलोय अशी कमेंट कॉर्पोरेटमध्ये काम करणारे करु लागले आहेत. पाणीपुरी विक्रेत्याने त्याचा एका दिवसाचा नफा सांगितला ते ऐकून सोशल मीडियातील युजर्सनी पटकन त्याच्या संपूर्ण महिन्याचा हिशोब केला.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या एका पाणीपुरी विक्रेत्याशी गप्पा मारत आहे.. तुमचा रोजचा नफा काय आहे? असा प्रश्न व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने पाणीपुरी वाल्याला विचारला. त्यावर पाणीपुरी विक्रेता म्हणतो- 25. त्या व्यक्तीचा अंदाज आहे की 25 हजार?
यावर पाणीपुरीवाला स्पष्ट करतो की तो दररोज 2500 रुपये कमावतो. मग काय... लोकांनी 30 दिवस मोजले म्हणजे 75 हजार कमावत असल्याचा अंदाज लावला. ही रक्कम समजल्यानंतर, लोक त्यांच्या कॉर्पोरेट नोकऱ्यांना शिव्या देऊ लागले. तसे, तुम्ही किती कमावता? असा प्रश्न ते एकमेकांना विचारु लागले आहेत.
हा व्हिडिओ 5 डिसेंबर रोजी @vijay_vox_ या इन्स्टाग्राम हँडलवरून पोस्ट करण्यात आला होता. रीलला 15 लाखाहून अधिक लाईक्स आणि 3 हजार कमेंट्ससह 40 मिलियन (4 कोटी) हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या आहेत.
पाणीपुरीवाल्याचा दैनंदिन नफा जाणून घेतल्यानंतर आणि त्याच्या महिन्याच्या कमाईची मोजल्यानंतर सर्व यूजर्सना धक्का बसला. मी एमबीए केले ते व्यर्थ आहे असे एका युजरने लिहिले. तर मी आपल्या कुटुंबाचे पैसे विनाकारण वाया घालवून इतक्या डिग्री घेतल्या आणि आता मी बेरोजगार आहे, अशी कमेंट एकाने केली. अशा अनेक मजेशीर कमेंट्स या व्हिडीओखाली येत आहेत.