मुंबई : आपल्या पृथ्वीवर अनेक प्रकारचे प्राणी रहातात, त्यांपैकी काही प्राणी आपल्याला माहित असतात, तर काही प्राण्याची ओळख आपल्याला नसते. आपल्याला हे देखील माहित आहे की, जंगलाचे नियम हे माणसांच्या नियमांपेक्षा वेगळे असतात.  इथे एखादा भयावह किंवा मोठा प्राणी आपल्यापेक्षा दुर्बल असलेल्या प्राण्याची शिकार करतो आणि आपले पोट भरते. येथे कोणाचीही शिकार केल्याने कोणालाही शिक्षा मिळत नाही. उलट यामुळे त्या प्राण्याचे वर्चस्व वाढते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर कोणत्याही प्राण्याला जंगलात जिवंत रहायचे असेल, तर त्याला सिंहांपासून आणि वाघापासून त्यांचा स्वत:चा बचाव करावा लागेल, तरच ते जिवंत राहू शकतात. जंगलातील प्रत्येक प्राण्यांचे स्वतःचे एक खास असे वैशिष्ट्य असते आणि हे वैशिष्ट्य बहुतेकदा त्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांना मदत करतात.


जंगलातील बर्‍याच प्राणी आणि पक्षांचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये काही व्हिडीओ खरोखरच लोकांना आश्चर्य करणारे असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या जंगलातील एका व्हिडीओमधील दृश्य हे दुर्मिळ असल्याने ते इंटरनेटच्या जगात सर्वत्र आपले वर्चस्व गाजवत आहे.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक लहान प्राणी बिबट्याचा माज उतरवताना दिसत आहे.


या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, शिकार करण्याच्या प्रयत्नात एक बिबट्या साळिंदर मागे लागला आहे. परंतु या बिबट्याला हेच समजत नव्हते की, या साळिंदरला नक्की कसं आणि कुठून पकडावं. कारण तुम्हाला माहितच आहे की, साळिंदर हा असा प्राणी आहे, ज्याच्या संपूर्ण अंगावर काटे असतात ज्यामुळे आपण त्याला पकडू शकत नाही.


या बिबट्या सोबत ही तसंच काहीसं झालं आहे. त्याने तरीही साळिंदरला पकडण्याचा प्रयत्न केला तर, त्याला देखील माहित आहे की, हा काटे सोडल ज्यामुळे आपण जखमी होऊ शकतो. ज्यामुळे बिबट्याही त्याला हात लावण्याची हिम्मत करत नव्हता. जरी बिबट्या साळिंदरला कसे मारायचे हे शोधं घेण्याचा प्रयत्न बिबट्या करत असतो आणि खाली हाताने परत जातो.


ही क्लिप ट्विटर यूझर @darksidenatures  यांनी 12 जुलै रोजी सोशल मीडियावर शेअर केली, ही बातमी लिहिण्यापर्यंत 3 हजाराहून अधिक लाईक्स आणि 600 हून अधिक रीट्वीट मिळू शकले आहेत.



हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूझरने लिहिले की, तो छोटा दिसतो परंतु तो गंभीर जखमी करु शकतो हे बिबट्याला लवकरच समजले. ज्यामुळे बिबट्या स्वत:चा जीव वाचला आहे. याशिवाय या व्हिडीओवर बर्‍याच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स दिल्या आहेत.