Pregnant Lady Gym Viral Video: आपल्या सगळ्यांनाच जीममध्ये व्यायाम करायला आवडतो त्यातून फीट राहणं ही आजची मोठी जीवनशैली (Lifestyle Videos) झाली आहे. आपल्या धावत्या जीवनशैलीमुळे आपल्याला सध्याच्या युगात फीट राहणं हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. नोकरी आणि पर्सनल लाईफ या सगळ्यांचा बॅलन्स राखणं हे आपल्यासाठी खूप कठीण जात असते. त्यामुळे त्यातून स्वत:साठी वेळ काढणंही आपल्याला अनेकदा कठीण होऊन जातं. आपली घरगृहस्थी (Trending Gym Videos) सांभाळून आपल्याला आपल्यासाठीही वेळ काढायचा असतो. करिअरमधून आणि कुटुंबियातून वेळ काढून आपल्याला आपल्यासाठी वेळ काढायचा असतो आणि तेव्हा कुठेतरी जाऊन आपण जीमसाठी वेळ काढतो. अनेकदा इंटरनेटवर जीमचे व्हिडीओज व्हायरलही होत असतात. त्यातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे, परंतु तो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. (Viral Video pregnant woman workout at gym for 9 months baby turn out with muscles)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरोदरपणात डॉक्टर स्त्रियांना आराम घ्यायला सांगतात. त्यातून त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी आराम करणं आवश्यक असते. परंतु असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात ज्यात प्रेग्नंट महिलाही फिटनेस फ्रीक असतात. त्याही जीम म्हणा नाहीतर कुठल्याही स्पोर्ट्स एक्टिव्हीटीमध्ये (Pregnant Women Videos) सहभाग घेत असतात. कधी गरोदर असतानाही धावतात. मोठं कठीण किंवा अवघड कामही करून दाखवतात. त्यामुळे पाहणारे पाहताच राहतात. या महिलांना आणि त्यांच्या बाळांना काहीच कसं होतं नाही असा प्रश्नही पडतो. परंतु असे व्हिडीओज हे सोशल मीडियावर एन्जॉयही केले जातात. 


सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांचे लक्ष त्या व्हिडीओकडे वळले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक गरोदर महिलेनं चक्क 9 महिने सलग जीममध्ये स्क्वाट्सपासून ते हेव्ही लिफटिंगपर्यंत व्यायाम केला आणि तिनं तिच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात तिचे बाळ हे एखाद्या मस्क्यूलर बेबीप्रमाणे (Baby with Muscles) झाले आहे. या व्हिडीओ पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 



@yoanabanda या अकांऊटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यानं महिलेच्या बाळाचे मसल्स पाहून अनेकांनी Impossible असं म्हटलं आहे. परंतु हे खरं आहे. या व्हिडीओच्या खाली अनेक नानाविध कमेंट्स येताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओप्रमाणे तुम्ही अशी स्टंटबाजी करू नका. गरोदरपणात जीममध्ये काहीही करण्याअगोदर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.