मुंबई : साप... साप... ऐकताच लोकांची तारांबळ उडते. तर काही लोकांच्या अंगावर काटा येतो. भारतातले काही साप अतिशय विषारी आहेत. त्यांच्या दंशामुळे आजवर अनेकांचे मृत्यू झाले आहेत. परंतू अशा या खतरनाक प्राण्यासोबत खेळणाऱ्या तसेच मस्ती करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतू सापाशी खेळाचा नाद तरुणाला चांगला महागात पडला आहे. नक्की काय झाले हे तर तुम्हाला कळेलच परंतू तुम्ही चुकूनही असा खेळ करण्याच प्रयत्न करू नका, नाहीतर ही मस्ती जिवावर बेतू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियाच्या जगात काय व्हायरल होईल सांगता येत नाही. जगात घडणाऱ्या असंख्य गोष्टी, व्हिडीओ, फोटो वेगवेगळ्या माध्यमातून व्हायरल होत असतात. अनेकदा लोक सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वसतःचा जीव धोक्यात टाकतात.


नुकताच भारतात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात एका मुलाने मोठा साप हातात पकडला आहे. हा साप अतिशय लांब आणि खतरनाक दिसत आहे. तरी मुलगा बराच वेळ त्याच्याशी खेळत असतो. सापाला फुंकर मारीत असतो. परंतू साप काहीही करू शकत नाही. कारण त्या मुलाने सापाची मान घट्ट पकडलेली असते. 


परंतू तो मुलगा एवढ्यावरच थांबत नाही. या सापाला तो आपल्या डोक्याजवळ आणतो. दरम्यान, सापाच्या घट्ट धरलेली सापाची मान सैल होते. आणि साप मोठ्या वेगाने त्या मुलाच्या डोक्यावर हल्ला करतो. हे चित्र खरोखर भितीदायक आहे. 



हा व्हिडीओ ट्विटरवर @Folico_ नावाच्या हॅडलवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक लोकांनी मुलाच्या मस्तीची टीका केली आहे. तर अनेकांनी सापाचेच कौतुक केले आहे. सापाने आपल्याला त्रास देण्याऱ्याचा बदला घेतला. असेही काही युजर म्हणत आहेत.