School Girl Fight Video : बंगळुरुमधल्या (Bengaluru) एका प्रतिष्ठित शाळेतील मुलींच्या आपापसातील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलींच्या दोन गटात हाणामारी झाल्याचं पाहिला मिळतंय, सर्व मुली शालेय गणवेशात असून शाळेसमोरच त्यांच्यात फ्रिस्टाईल हाणामारी झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेसमोर मुलींचे दोन गट भिडले
हा व्हिडिओ बंगळुरुमधल्या बिशप कॉन्व्हेंट स्कूलच्या (Bishop Convent School) विद्यार्थिनींचा असल्याची माहिती समोर आली आहे. शाळेतील मुलींच्या दोन गटात कोणत्या तरी कारणावरुन वाद झाला, हा वाद इतका टोकाला गेला दोनही गटताली मुलींमध्ये फ्रिस्टाईल हाणामारी सुरु झाली. मुली एकमेकांचे केस धरून ओढत होत्या, एकमेकींना काठ्याने मारत होत्या. धक्कादायक म्हणजे मुलींच्या या भांडणात त्यांचे पालकही सहभागी झाले होते. 


हाणामारी आणि आरडाओरडा
भर रसत्यात सुरु असलेली ही हाणामारी बराच काळ सुरु होती. व्हिडिओत मुलींचा जोरजोरात आरडाओरडा सुरु असल्याचंही ऐयकाला येत आहे. रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या काही लोकांनी मध्यस्थी करत मारामारी सोडवण्याचा प्रयत्नही केला. हा सर्व प्रकार अज्ञाताने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि त्यानंतर हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.



दरम्यान, बिशप कॉन्व्हेंट स्कूलकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.