मुंबई : आपल्यापैकी बरेच असे लोकं आहेत. ज्यांना लहानपणी अभ्यास करायला आवडायचे नाही. त्यापासून लांब पळण्यासाठी अनेकांनी विविध कारणं देखील शोधून काढली असतील. जी काहीवेळा समोरच्याला पटली किंवा पटली नाहीत. ज्यामुळे त्यांनी शिक्षकांचा किंवा घरच्यांचा मार देखील खाल्ला असेल. लहान मुलांचा जास्त कल हा खेळण्याकडे असतो, म्हणून त्यांना अभ्यास करायला फारसे आवडत नाही. तसेच बरीच लहानमुले लहानपणीच आपल्या मनात एक इच्छा ठेवतात की, मला मोठं होऊन काय बनायचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही लहान मुलाला विचारलं की तुला मोठं होऊन काय बनायचं आहे? तेव्हा तुम्हाला काही ठरावीक उत्तरे मिळतील. जसे की डॉक्टर, पायलट, इंजिनीअर किंवा सैन्याचे अधिकारी. यामागे लहान मुलांच्या काही कल्पना असतात, ज्यामुळे ते मनात असं ठरवतात.


परंतु आम्ही तुम्हाला एक व्हिडीओ दाखवणार आहोत, यामधील हा लहान मुलगा आयुष्यात काय बनायचं हे ठरवतो, पण त्यामागचं त्याचं कारण हे खूपच धक्कादायक आणि मनोरंजक आहे.


सध्या, सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. यामध्ये एक मुलगा अभ्यास टाळण्यासाठी भविष्यात इंजिनीअर होण्याविषयी बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये त्याचे उत्तर ऐकून सोशल मीडियावरील इंजिनीअर थक्क झाले आहेत.


खरं तर, व्हिडीओमध्ये मुलाची आई त्याला शिकवताना दिसत आहे. यादरम्यान, हा मुलगा रडायला लागतो. त्याला अभ्यास करायचा नसतो. त्याची आई त्याची ही सगळी नाटकं ओळखते आणि त्याच्या या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता त्याला अभ्यास करायला प्रवृत्त करते.


त्यावर मुलाचे म्हणणे आहे की, शाळेत फक्त अर्धा तास शिकवले जाते आणि ती (आई) बराच वेळ शिकवत आहे. असे म्हणत ते मूल डोळ्यात पाणी आणून रडू लागते. यानंतर त्याची आई म्हणते की तू अभ्यास केलास तरच काहीतरी बनू शकशील. ज्यावर मुलगा म्हणतो की, 'त्याला इंजिनियर व्हायचे आहे, कारण इंजिनियर होण्यासाठी अभ्यासच करावा लागत नाही.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या या मुलाचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. @memewalanews नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. मुलाचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून अनेक इंजिनियरचे मन तुटले आहे. काही वापरकर्ते म्हणतात की इंजिनियर होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर या व्हिडीओवरून सोशल मीडियावर इंजिनीअरची खूप खिल्ली देखील उडवली जात आहे