नागपुरात बाहुबली पाणीपुरीचा बोलबाला... ही तुम्हाला खायला आवडेल का? पाहा व्हिडीओ
या डिशची सुरुवात मोठ्या आकाराच्या पुरीपासून होते.
नागपूर : पाणीपुरी म्हटलं की, आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या तोंडाला पाणी सुटू लागतं. काही भागात लोकं त्याला गोलगप्पा, पुच्का, बटाचे अशा वेगवेगळ्या नावानं देखील तिला ओळखतात. तुम्ही अनेक प्रकारचे किंवा चवीची पाणीपुरी खाल्ली असेल, परंतु तुम्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही पाणीपुरी कधीही खाल्ली नसणार.
ही पाणीपुरी आहे बाहुबली पाणीपुरी, नाव ऐकून तुम्हाला ते पाहण्यासाठी आणि खाण्यासाठी उत्सुक्ता वाटेल. ही बाहुबली पाणीपुरी सध्या सगळ्या पाणीपुरी लव्हरला इम्प्रेस करत आहे.
फूड ब्लॉगर लक्ष्य ददवानीनी यांनी यूट्यूबवर शेअर केलेल्या बाहुबली पाणीपुरीच्या व्हिडिओला 31 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हा भारतातील टॉप ट्रेंडिंग व्हिडींओंपैकी एक आहे. व्हिडीओमध्ये दाखवलेले स्ट्रीट फूड विक्रेता नागपूरच्या प्रताप नगरमध्ये राहतो, त्याच्या दुकानाचं नाव चिरागचा चास्का आहे. या स्वादिष्ट पाणीपुरीच्या अनोख्या आणि मनोरंजक कारणामुळे ही पाणीपुरी आणि हा व्हिडीओ अनेक वेळा चर्चेत राहिला आहे.
या डिशची सुरुवात मोठ्या आकाराच्या पुरीपासून होते, जी नंतर विविध प्रकारच्या चटण्या आणि पाण्याने भरली जाते. तेथे चिंचेची चटणी, त्यानंतर पाणी, हंगामी संत्रा पाणी (उन्हाळ्यात आंब्याच्या पाण्याने), जिरे पाणी आणि लसणीचे पाणी असते. नंतर, बटाट्याचे स्टफिंग जे सामान्यतः पाणीपुरीच्या आत भरले जाते, परंतु आकारात एक प्रचंड गोलाकार असलेली ही पुरी पाणीपुरी लव्हरचं लक्ष खेचून घेत आहे.
तुम्हाला ही पाणीपुरी खायला आवडेल का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये सांगा.