इंदूर : सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोकं अनेक भन्नाट कल्पना शोधत असतात. अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर रोज पाहत असतो. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येतं की हौसेला मोल नसतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात पावसाचं आगमन झालं आहे आणि श्रावण महिना पण लवकर येणार आहे. पावसासोबत सध्या लग्नाचा सिझन आहे. ज्यामुळे आपल्याला आपल्या आजूबाजूला लगीनघाई पाहायला मिळते.


तसे पाहाता लग्न हे एकदाच होतं, त्यामुळे सहाजिकच वरातही एकदाच निघणार, मग जर अशावेळी पाऊस आला तर काय करणार? वरात थांबवणार? शक्यंच नाही....


सध्या सोशल मीडियावर असाच एका लग्नाच्या वरातीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भरपावसात या नवरदेवाची वाजगाजत वरात निघाली आहे.


आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, नवीन कपडे घालून लग्नासाठी तयार झालेले लोक कसे काय वरात काढतील? मग एकदा हा व्हिडीओ पाहा तुमच्या सगळं काही लक्षात येईल.



या वरातील पाहुण्यांनी पावसापासून आपल्या बचाव करण्यासाठी भन्नाट कल्पना शोधून काढली आहे. या व्हिडीओला कोणी मान्सून वेंडिग तर कोणी ताडपत्री वरात म्हणतं आहेत.


कुठला आहे हा व्हिडीओ?
44 सेकेंडच्या व्हिडीओमध्ये भरपावसात वरातील पाहुणे मोठ्या पिवळ्या ताडपत्रीच्या खाली दिसत आहे.  विशेष म्हणजे या वरातीत डीजे पण आहे. डीजेने लावलेल्या दलेर मेहंदीच्या 'बोलो तारा रा रा' गाण्यावर वरात एकदम जोशात आपल्या नववधूला घ्यायला निघाली आहे. हा व्हिडीओ मध्यप्रदेशातील इंदूरमधील आहे.


मंगळवारी इंदूरमध्ये पाऊस झाला. परंतु पावसाला न जुमानता या नवरदेवाने आपली वरात मोठ्या जल्लोषात काढली.


हौशेला मोल नाही
मान्सून वेडिंग हा व्हिडीओ मोठ्या संख्येने यूजर्सने पाहिला आहे. या व्हिडीओवर केमंट्सचाही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. हा व्हिडीओ पाहून हौशेला मोल नाही, असं अनेकांचं म्हणं आहे.


तर कुठल्याही परिस्थितीत निराश न होता मार्ग कसा काढायचा हे या व्हिडीओतून दिसून येत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्यूज मिळाले आहेत.