Amusement पार्कमध्ये स्लाइडचा थरार, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, `नको रे बाबा!`
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
मुंबई : अमेरिकेतील मिशिगनमधील एका अम्युझमेंट पार्क एका मोठ्या स्लाइडमुळे अडचणीत आलं आहे. मिशिगनमधील ही मोठी स्लाइड शुक्रवारी पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मात्र, पालकांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर काही तासानंतरच ती स्लाइड बंद करण्यात आली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या स्लाइडवरून खाली जात असताना लोक स्लाइड नाही तर पडताना दिसत आहेत. या व्हिडीओला 11 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. स्लाइडजवळ कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यानं हा व्हिडिओ पाहून काही नेटकरी आश्चर्यचकित झाले. तर काहींनी या स्लाइडवर जाणं म्हणजे वेडेपणा असल्याचं म्हटलं आहे.
हा व्हिडीओ शेअर करत एक नेटकरी म्हणाला, 'हा व्हिडिओ पाहून मला खूप हसू आलं, पण माफ करा, हे योग्य नाही हे समजायला मला 4 तास लागले.' दुसरा नेटकरी म्हणाला,'जर 2022 एक स्लाइड असेल, तर ती ही आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला,' बेले आइल पार्कमधील ही स्लाइड सर्वोत्तम आहे आणि ती हवी तशी काम करत आहे.'
केन्याटा मॅकडॅनी, उद्यानाता जाणारी एक व्यक्ती म्हणाली, 'मजा ही मुलांसाठी एक शिक्षा बनली आहे कारण वेग ही समस्या बनली आहे. तुम्ही डोंगरावरून जमिनीवर कसे पडत आहात. मी जितका विचार करतो त्या पेक्षा जास्त वेगानं खाली ते खाली पडत होते. तर अशी माहिती आहे की स्लाइड बंद करण्यासाठी ऑपरेटला चार तास लागले. शनिवारी संध्याकाळी स्लाइड पुन्हा सुरु करण्यात आल्या आणि सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.