चोरी करण्यासाठी संपूर्ण तयारीनिशी दुकानात शिरले चोर, पण ग्राहकामुळे असा फसला प्लॅन, पाहा व्हिडीओ
आतपर्यंत तुम्ही अनेक चोरीचे व्हिडीओ पाहिले असतील परंतु ही चोरी काहीशी वेगळं आहे.
मुंबई : सोशल मीडियाच्या जगात, आजकाल बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ असे असतात की, ते त्याच्या विशिष्ट कारणामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतात. आज पुन्हा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. जो पाहून तुम्हाला आश्चर्य तर वाटेलच, या शिवाय तुम्हाला या व्हिडीओमधील व्यक्तीचं कौतुक देखील करावसं वाटेल.
आतपर्यंत तुम्ही अनेक चोरीचे व्हिडीओ पाहिले असतील परंतु ही चोरी काहीशी वेगळं आहे, कारण यामध्ये चोरांना काही समजण्याच्या आत त्यांचा खेळ संपला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकत की, जिथे दोन चोर चोरी करण्यासाठी दुकानात घुसतात. मात्र तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने एवढी जबरदस्त चपळाई दाखवली की दोन्ही चोरांना काय करावं हे सुचलचं नाही, ज्यामुळे अखेर त्यांना तेथून अगदी काही सेकंदात पळ काढावा लागला.
या व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, दोन्ही चोर दुकानाचा दरवाजा उघडून आत शिरतात आणि तेथे स्टोअरमध्ये बंदूक दाखवू लागतात. तिथे पोहोचल्यानंतर पण तेवढ्यात दुकानात उभ्या असलेल्या व्यक्तीने चोराची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि ती दुसऱ्या बाजूला वळवली. हे पाहून मागून आलेला चोर लगेच तिथून पळून गेला.
एका अहवालानुसार, ज्या व्यक्तीने चोरांची ही योजना उधळून लावली, त्याचे नाव जेम्स किलसर आहे. त्याने अमेरिकन मरीनमध्ये सेवा बजावली आहे. त्याने तात्काळ त्या चोराने स्टोअरमध्ये येताच त्याची बंदूकही हिसकावली. आता त्याच घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारे हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आणखी एका माहितीनुसार, ही घटना अमेरिकेतील असल्याचे सांगितले जात आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की, दोन चोर हातात बंदुका घेऊन दरोडा घालण्यासाठी येथे आले होते. दोन्ही चोरांनी मुखवटा घातलेला दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.
सोशल मीडियावरती या व्यक्तीच्या कामचे लोकं भरभरुन कौतुक करत आहेत, तर काही लोक त्याच्या तत्पर घेतलेल्या कृतीचीही दाद देत आहेत.