मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी खूप छान छान गोष्टी ऐकल्या असणारच. आपण त्या एखाद्या पुस्तकातून वाचल्या असतील तर, कधी कोणी ऐकवल्या असतीलय. आपण एखादी गोष्ट ऐकताना आपल्या मनात त्याचे दृश्य तयार करतो आणि ती गोष्ट आपल्याला खरी खुरी वाटते. तुम्ही कधी असा विचार केलात का? की या ऐकलेल्या गोष्टींपैकी एखादी गोष्ट मला खरोखरच पाहायला मिळाली तर? जर तुम्हाला तुमच्या लहानपणीची एक गोष्ट खरोखरच होताना दाखवली तर पहायला आवडेल का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हो आमच्याकडे असाच एक व्हीडिओ आहे की, जो तुम्हाला लहानपणीच्या गोष्टीची आठवण करुन देईल. ही गोष्ट आहे तहानलेल्या कावळ्याची. ज्यामध्ये तुम्ही ऐकले असणार की, कसा कावळा आपल्या युक्तीचा वापर करुन तळाला गेले पाणी पितो. हा व्हीडिओ तशाच एका हुशार कावळ्याचा आहे. ज्यामध्ये तो आपल्या युक्तीचा वापर करुन पाणी पित आहे.


पण काळाप्रमाणे कावळ्याची युक्ती बदलली आहे. माणसं पहिले मडक्यात किंवा एखाद्या भांड्यात पाणी साचवायचे आणि त्यातून पाण्याचा वापर करायचे. परंतू आता आपण पाण्याच्या टाकीचा वापर करतो आणि नळाच्या सहाय्याने पाणी वापरतो. त्यामुळे कावळ्यालाही काळा प्रमाने आपली युक्ती बदलावी लागली.



या व्हीडिओमध्ये कावळा पाण्याचे नळ उघडून पाणी पित आहे. तुम्ही त्याची नळ उघडण्याची शक्कल पाहिलात तर तुम्हाला नक्कीच त्याच्या हुशारीला दाद द्यावीशी वाटेल.