खोलीत आराम करत होते लोक, अचानक फिरता पंखा पडला खाली आणि... पाहा व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक एका खोलीत आराम करत आहेत.
मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या बाबतीत हे घडलं आहे की, आपण वरती फिरणाऱ्या पंख्याकडे पाहातच राहातो आणि मग अचानक विचार येतो की, हा पंखा पडला तर? आणि असा विचार करून घाबरून जातो. तसे पाहाता सहसा पंखा काही छतावरुन खाली पडत नाही, कारण त्यासाठी त्याला चांगलं फिक्स करुन त्याची योग्य ती काळजी घेतली जाते. परंतु या आपल्या कल्पनेशी संबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक एका खोलीत आराम करत आहेत आणि तेव्हाच छताचा पंखा तुटून खाली पडतो. पंखा तुटण्याच्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. ज्यामुळे सगळेच घाबरले आहेत.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आणि लोकं यावर आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका छोट्या खोलीत सुमारे 3 लोक आराम करताना दिसत आहेत. सर्वजण शांत झोपले होते. त्यांच्यासोबत इतकी मोठी घटना घडेल, याची त्यांना कल्पनाही नव्हती.
लोक विश्रांती घेत असताना अचानक छताचा पंखा तुटून जमिनीवर पडला. पंखा पडताच सर्वजण जागे होतात आणि सर्वजण गोंधळून एकमेकांकडे पाहू लागतात. यासगळ्यात चांगली गोष्ट अशी की पंखा पडण्याच्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, सर्वजण थोडक्यात बचावले.
जर हा फॅन झोपलेल्या लोकांच्या अंगावर पडला असता तर नक्कीच मोठी घटना घडू शकली असती. पण चांगली गोष्ट हा पंखा दोन लोकांच्या मध्ये पडला. हा व्हिडीओ 1 लाख 95 हजारांहून अधिक वेळा पाहिला आणि लाईक करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, 'आता मला झोप कशी येईल.'