मुंबई : लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातात आपल्याला फोन पाहायला मिळतो. आपण सगळे फोनवर इतके अवलंबून राहू लागलो आहे की, एक दिवस जरी आपला फोन बंद असेल किंवा आपल्या जवळ नसेल, तर आपल्याला चुकल्या-चुकल्या सारखं वाटतं आणि बरीचशी कामं अर्धवट राहातात. सकाळी उठल्या उठल्या लोकांच्या दिवसाची सुरुवात होते ते फोननेच. लोक फोनच्या इतके आहारी गेले आहेत की, त्यांच्यासाठी फोन म्हणजे एक व्यसनच झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही कोणाकडेही बघा, तुम्हाला असेच दिसेल की, त्या व्यक्तीच्या हाताशी फोन जणू काही बांधला गेला आहे. चालतानाही अनेकजण फोन चालू ठेवतात. अगदी वॉशरूमपासून ते मार्केटच्या गल्ल्यांपर्यंत सगळीकडे लोकांच्या हातात फोन सुरू असतो. स्मार्ट फोनचे व्यसन इतके वाढले आहे की, लोकांना त्याची काळजी वाटू लागली आहे.


तुम्ही पाहिले असेल की, कार किंवा बाईक चालवतानाही अनेक लोक आपला फोन वापरतात. एवढंच काय तर आज काल खाता पिताना देखील लोक फोन वापरु लागले आहेत. 


सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण आपल्या फोनमध्ये इतका व्यस्त असल्याचे दिसत आहे की, त्याला समोरुन येणारं संकट दिसलंच नाही आणि त्यानंतर त्याच्यासोबत जो प्रकार घडला, तो सर्वांच्याच अंगावर काटा आणणारा आहे.


खरंतर हा व्यक्ती फोनमध्ये इतका व्यस्त असतो की, त्याला रस्त्यावर झाकण उघडं असतं, हे दिसत नाही आणि तो खाली जोरात पडतो.



नशीबाने या व्यक्तीला काहीही इजा झालेली नाही. परंतु विचार करा, जर या व्यक्तीला एवढ्या उंचावर पडून लागलं असतं, तर त्याला ते किती महागात पडलं असतं.


त्याचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठचा आहे समोर आलेलं नाही. पण The Sun या युट्यूब अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.