Viral Video: दिल्ली मेट्रोत बिकिनी (Bikini) घालून प्रवास करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार वाद सुरु झाला आहे. या व्हिडिओवरुन दोन गट पडले आहेत. काही लोकांनी या मुलीच्या थेट चारित्र्यावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. तर काही जणांनी या मुलीची तुलना सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदबरोबर (Urfi Javed) केली आहे. उर्फीच्या अतरंगी कपड्यांची नेहमीच चर्चा होत असते. पण मेट्रोत बोल्ड ड्रेस (Bold Dress) परिधान करुन प्रवास करणारी कोण याबाबत नेटकऱ्यांमध्येही उत्सुकता होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
दिल्ली मेट्रोत बिकिनी परिधान करुन प्रवास करणाऱ्या या मुलीचं नाव आहे ऋदम चनाना. बिकनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर ऋदम चनानाची (Rhythm-Chanana) जोरदार चर्चा सुरु झाली. तिच्या फॅशनवरुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. पण ऋदमच्या मते कोणते कपडे घालावेत याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) तिला अनेकांनी ती मुलगी तूच आहेस का असा प्रश्न विचारला. यावर ऋदमने हो मी तिच असल्याचं उत्तर दिलं आहे. 


ऋदमाचा पब्लिसिटी स्टंट?
बिकिनी घालून प्रवास करण्यामागे कोणताही पब्लिसिटी स्टंट (Publicity Stunt) नसल्याचं ऋदमने म्हटलं आहे. लोकं काय म्हणताय, याचा काहीच फरक पडत नसल्याचं तीने म्हटलं आहे. काही युजर्सने तिची उर्फी जावेदबरोबर तुलना केली आहे. उर्फी जावेदच्या अंतरंगी स्टाईलवरुन प्रेरित होऊन तू असे कपडे घातलेस का असा प्रश्ना तिला काही जणांनी विचारलाय. यावर तीने आपण उर्फी जावेदला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे. ऋदमची फॅमेली ही रुढी परंपरा जोपासणारी आहे. 



त्या वातावरणात तिला स्वत:च्या इच्छा पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. तिच्यावर अनेक बंधनं होती. या बंधनांना ती कंटाळली होती. त्यामुळे एकेदविशी तीने मनाशी निश्चय केला, जे मनात येईल ते कारायचं. आता तीला वाटेल त्या कपड्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरते आणि असं करण्यात तिला काहीही गैर वाटत नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. इतकंच काय नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी तिला धमकीही दिली. पण आपण कोणालाही घाबरत नसल्याचं तिचं म्हणणं आहे.


दिल्ली मेट्रो व्यवस्थापनाची प्रतिक्रिया
ऋदमचा बिकिनीतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने प्रतिक्रिया दिली आहे. सर्व प्रवशांनी नियम आणि शिष्टाचाराचं पालन करावं. प्रवाशांनी असे कपडे परिधान करु नयेत ज्याने दुसऱ्या प्रवाशांना लज्जित व्हावं लागेल.