Viral Video : बाजारात सध्या विविध कंपन्यांचे स्मार्टफोन (SmartPhone) उपलब्ध आहेत. यात काही हजारांपासून लाखांपर्यंतचे स्मार्टफोन असून यात हाय क्वालिटीचा कॅमेरा, मोठी स्क्रिन, जास्त स्टोरेज असे अनेक फिचर्सही आहेत. पण आजही iPhone ची मागणी जास्त आहे. iPhone वापरणं स्टेटस सिम्बॉल समजलं जातं. आयफोनची किंमत जास्त असली तरी हा फोन विकत घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आयपीफोनची क्रेझ तरुण आणि नोकरदार वर्गामध्ये जास्त आहे. काही जण असेही असतात की बाजारात आयफोनचं नवं मॉडेल आलं की लगेच विकत घेतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चोरबाजारातून खरेदी केला आयफोन
एका तरुणानेही आयफोन विकत घेतला, पण त्याच्याकडे नवा आयफोन विकत घेण्यासाठी तितके पैसे नसल्याने त्याने चोर बाजारातून iPhone 15 pro या लेटेस्ट मॉडेलचा फोन विकत घेतला. पण यानंतर त्याच्यासोबत जे घडलं त्याचा व्हिडिओ तरुणाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक तरुण हातातला iPhone दाखवताना दिसतोय. व्हिडिओत तो म्हणतोय, मित्रांनो मी आज iPhone 15 pro विकत घेतला. चोर बाजारात हा फोन फक्त 10 हजार रुपयांना मिळाला. हा एकदम ओरिजनल आयफोन आहे. मी तुम्हाला या फोनचे फिचर्स दाखवतो. पण त्याचा फोन ऑन होत नाही, त्यानंतर आपण हा फोन चार्ज करुया असं तो सांगतोय. चार्ज झाल्यानंतर तो तरुण आयफोन ऑन करतो. पण ऑन करताच त्याला धक्का बसतो. 


ऑन केल्यावर फोनमध्ये काय दिसतं?
आयफोन ऑन करताच तरुणाच्या पायाखालची जमीन सरकते. फोन ऑन केल्यावर सर्वात आधी आयफोनच्या स्क्रिनवर Apple चा लोगो दिसतो. अॅपलचा लोगो पाहुन तरुण खुश होतो, पण त्याचा हा आनंद काही क्षणच टिकतो. कारण Apple च्या लोगोनंतर एकामागोमाग एक सॅमसंग, मोटो, लेनोवो आणि नोकियाचे लोगो सुरु होतात. हे पाहिल्यावर तरुणाच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by NAUGHTYWORLD (@naughtyworld)


सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर  naughtyworld नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 29 हजाराहून अधिक लोकांनी पाहिलाय. यावर अनेक युजर्सने मजेशीर कमेंट्सही केल्यात. एका युजरने म्हटलंय, भावा एकाच फोनमध्ये सर्व फोनची मजा मिळेतय. दुसऱ्या एका युजरने म्हटलंय सर्व कंपन्यांच्या फोनचा आत्मा एका फोनमध्ये आलाय. तर एका युजरने म्हटलंय नशीब यात Hyundai आणि महिंद्राचा लोगो नाहीए. एका युजरने या फोनला सर्व गुण संपन्न म्हटलंय.


व्हिडिओत किती तथ्य?
मोबाईलच्या सर्व कंपन्यांचे लोगो चोर बाजारातून घेतलेल्या या आयफोनमध्ये दिसत असलेल्या व्हिडिओत किती तथ्य आहे याबाबत स्पष्टता नाही. व्हायरल होण्यासाठी या तरुणाने सर्व लोगोंचा एडिटेड व्हिडिओ तयार करुन तो मोबाईलमध्ये दाखवला असण्याचीही शक्यता आहे.