`हो मी इंग्लंडमध्ये रस्त्यावर शर्ट काढून फिरेन`, गांगुलीला विराटचं उत्तर
भारतीय क्रिकेटची आक्रमकतेच्या इतिहासात हा देखील एक अध्याय नोंदवला गेला आहे.
कोलकाता : टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुलीने म्हटलंय की, २०१९ चा वर्ल्डकप टीम इंडिया नक्की जिंकेल आणि ऑक्सफर्डच्या रस्त्यावर विराट कोहली, शर्ट काढून, सिक्स पॅक दाखवत, हातात ट्रॉफी घेऊन फिरेल. सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याला, मैत्रीच्या स्वरूपात विराट कोहलीने हे उत्तर दिलं आहे. सौरव गांगुलीने यापूर्वी देखील एकदा आपलं शर्ट काढून भिरकावलं होतं. भारतीय क्रिकेटची आक्रमकतेच्या इतिहासात हा देखील एक अध्याय नोंदवला गेला आहे. इंग्लंडमधील लॉर्डसच्या मैदानावर टार्गेट पूर्ण करताना १६ वर्षाआधी २००२ मध्ये टीम इंडियाने नेटवेस्ट सिरीज जिंकली होती. तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या सौरव गांगुलीने आनंद व्यक्त करताना, आपलं शर्ट काढून हवेत भिरकावलं होतं.
सौरव गांगुलीने म्हटलं आहे, मी गॅरंटी देऊ शकतो की....
सौरव गांगुलीच्या या मजेदार वक्तव्याला, विराट कोहलीने देखील मजेदार उत्तर दिलं आहे. टीम इंडिचा कॅप्टन विराट कोहली यावर म्हणतो, "१०१ टक्के मी शर्ट काढून फिरेन, मला नाही वाटत की, असं मी एकटा करेन, कारण टीममध्ये मी एकटा नाही, अनेक लोकांकडे सिक्स पॅक्स आहेत. आम्ही शर्ट उतरवून नक्कीच फिरणार, पण यात हार्दिक पंड्या, बुमराह देखील असेल. आमच्याकडे देखील काही उमेदवार आहेत".
सौरव गांगुली आणि विराट कोहली कोलकातामघ्ये एका बुक लॉन्च एव्हेन्टला उपस्थित होते, त्या दरम्यान ही चर्चा झाली.