नवी दिल्ली : 'महिला हे नरकाचे द्वार आहे. त्यामुळे त्यांना कैदेतच ठेवायला हवे', ही वक्तव्ये आहेत एका वकिलाची. तिसूद्धा कुठे इथे तिथे केलेली नव्हे. तर, चक्क न्यायालयात. कायद्याची पदवी मिळवून न्यायालयात वकिली करणाऱ्या वकिलाची ही वक्तव्ये ऐकून न्यायालयही चांगलेच संतापले. वकिलाला वेळीच समज देत न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली.


वीरेंद्र देवच्या वकिलाचे संतापजनक वक्तव्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीतील एका आश्रमात महिला आणि मुलींना कोंडून ठेवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेले आणि सध्या फरार असलेला बाबा वीरेंद्र देव याच्यावर न्यायालयात खटला सुरू होता. या वेळी वीरेंद्र देवच्या वकिलाने हे संतापजनक वक्तव्य केले. वकिलाने हे वक्तव्य करताच न्यायालयात एकच गोंधळ सुरू झाला. प्रकरणाची सुनावनी सुरू असताना दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुखही कोर्ट रूममध्ये उपस्थिती होत्या. त्यांनी वकिलाच्या वक्तव्याचा निशेध करत लागलीच आपली नाराजी व्यक्त केली. तसेच, वकिलाच्या वक्तव्यावरही आक्षेप नोंदवला.


वकिलाला न्यायालयाबाहेर हाकलले


वकिलाच्या वक्तव्यावर दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती जयहिंद यांनी सांगितले की, या प्रकरणाची सुनावनी ज्यांच्यासमोर होत आहे त्या न्यायाधीशही एक महिलाच आहेत. त्यासुद्धा वकिलाच्या या वक्तव्यामुळे प्रचंड नाराज झाल्या. वक्तव्य ऐकताच न्यायाधीशांनी वकिलाला आणि त्याच्या सहकाऱ्याला तत्काळ कोर्टाबाहेर जा, असे आदेश दिले.


म्हणे, 'महिला हे नरकाचे द्वा'


न्यायालयात आपली बाजून मांडत असताना बाबा वीरेंद्रच्या वकिलाने सांगतले की, आमच्यावर देशातील कोणताच कायदा लागू होत नाही. कारण आम्ही जे करतो आहोत ते करण्यास आम्हाला ईश्वरानेच सांगितले आहे. त्यामुळे आपण आमची बाजूही ऐकली पाहिजे. युक्तिवाद ऐकताच न्यायालयाने वकिलाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली. बाजू मांडत असताना वकिल भलतीकडेच घसरला. तो म्हणाला, 'महिला हे नरकाचे द्वार आहे. त्यांना कैदच करून ठेवायला हवे'.