`हे` भारतीय होते जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, औरंगजेबाने साधला संपर्क; मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटांपेक्षाही श्रीमंत
आज आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, जे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटांपेक्षाही त्यांच्याकडे अपार श्रीमंती होती. मुघल सम्राट्याना हा उद्योगपती लोन द्यायचा.
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती कोण असा प्रश्न आला तर आपल्या डोळ्यासमोर सर्वात प्रथम आशियातील श्रीमंत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे येतात. त्यानंतर गौतम अदानी (Gautam Adani ) आणि रतन टाटा (Ratan Tata) हे भारतातील श्रीमंत उद्योगपती आहेत. पण तुम्हाला मुघल काळातील जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीच नाव माहितीये का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, हा व्यक्ती भारतीय होता. मुघल काळात भारताच्या व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर वर्चस्व गाजवणारे एक दिग्गज व्यापारी म्हणून त्यांची ओळख आहे. हे होते गुजरातमधील वीरजी व्होरा, ज्यांना काही लोक इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यापारी मानतात, ज्यांची संपत्ती आजच्या उद्योगपतींपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. (Virji Vora world s richest businessman contacted by Aurangzeb Richer than Mukesh Ambani Gautam Adani Ratan Tata)
मुघलांना, इंग्रजांना दिले होते पैसे उधार!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या रेकॉर्डमध्येही त्याचंं वर्णन हे आतापर्यंतचे सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून करण्यात आलं. 16 व्या शतकात त्यांची संपत्ती सुमारे 80 लाख डॉलर्स होती, असं सांगण्यात आलंय. वीरजी व्होरा हे इंग्रजांमध्ये मर्चेंट प्रिंस म्हणजे व्यापारी राजकुमार म्हणून ओळखले जायचे. गुजरातमधील सुरतमधील वीरजी व्होरा यांनी 25 ऑगस्ट 1619 रोजी इंग्रजांना 25000 महमूदी उधार दिल्या होत्या. यानंतर 1630 मध्ये त्यांनी आग्र्याच्या इंग्रजांना 50000 रुपये उधार दिले होते अशी इतिहासकार सांगतात.
इतकंच नाही तर नोंदीनुसार 1635 मध्ये त्यांनी इंग्रजांना 20000 रुपये उधार म्हणून दिले होते. त्यानंतर 1636 मध्ये त्याने 2 लाख रुपये उधार दिले. त्याकाळात जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीला पैशांची गरज भासायची तेव्हा ते वीरजी व्होरा यांच्याकडे जायचे. वीरजी व्होरा हे होलसेल विक्रेते होते. सुरतमधून ते मसाले, सराफा, प्रवाळ, हस्तिदंत, शिसे, अफू आदी वस्तूंची ते देशभर निर्यात करायचे. त्यांच्याबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध होती ती म्हणजे जगातल्या कोणत्या बाजारात काय विकता येईल हे त्यांना अचूक माहिती असायचं.
औरंगजेबानेही घेतली वीरजींकडून मदत
व्होरा हे केवळ एक यशस्वी व्यापारीच नव्हते तर ते एक प्रतिष्ठित सावकार देखील होते. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आणि प्रमुख इंग्रज व्यापाऱ्यांनीही त्याच्याकडे कर्ज मागितले. त्याचा प्रभाव इतका होता की मुघल सम्राट औरंगजेबने दख्खन प्रदेश जिंकण्याच्या मोहिमेदरम्यान आर्थिक मदतीसाठी वीरजी व्होराकडे गेले होते.
वीरजी व्होरा यांचं जागतिक व्यापार साम्राज्य
वीरजी व्होरा यांचा प्रभाव भारताच्या सीमेपलीकडे पसरला होता. त्याचे व्यापार नेटवर्क पर्शियन गल्फ, लाल समुद्र आणि दक्षिण-पूर्व आशियातील प्रमुख बंदर शहरांमध्ये पसरले होते. त्याचे एजंट जगभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये, आग्रा, बुरहानपूर, गोलकोंडा, गोवा, कालिकत, बिहार, अहमदाबाद, वडोदरा आणि बारुच यासारख्या गंभीर व्यापार केंद्रांमध्ये होते. त्याने व्यापार मार्गांवर वर्चस्व राखले आणि काही वस्तूंवर मक्तेदारी कायम ठेवली.
इ.स. 1590 मध्ये जन्मलेल्या वीरजींच्या वंशाविषयी किंवा घराण्याविषयी फारशी माहिती सापडत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माशी संबंधित आहेत. त्यांचा उल्लेख मुस्लीम आणि हिंदू किंवा जैन असा करण्यात आलाच पाहिला मिळतो. ते गुजरातमधील सुरतमधील असल्याने अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख हा गुजराती म्हणून करण्यात आलाय.