शिमला : शिमल्याला फिरायला तुम्ही नजीकच्या काळात जाणार असाल तर तुम्हाला लवकरच प्रसिद्ध कालका शिमला मार्गावरची हिरवाई नव्याने पाहायला मिळणार आहे. कालका शिमला या ऐतिहासिक नॅरोगेज मार्गावर व्हीस्टाडोम डबे चालवण्यात येणार आहेत. हे डबे दाखल झाले आहेत. त्याची चाचणी सध्या घेतली जात आहे. आगामी दहा दिवसांत हे डबे या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. याचं भाडं प्रती माणशी ७०० रूपये असणार आहे.


अागाऊ बुकिंग  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मार्गावरची हिरवाई, बर्फाच्छादीत शिखरं आणि थंडीत पडणारं बर्फ हे सौंदर्य या प्रवासात तुम्हाला पाहायला मिळेल. कालका शिमला या गाडीचा वेगही वाढवण्यात येणार आहे. तसंच याआधी या गाडीचं अागाऊ एक महिना बुकींग करावं लागत होतं.


ते आता करावं लागणार नाही. या मार्गाच्या भोवताली रेल्वेने नव्याने वृक्षारोपण केलंय त्यामुळे आगामी काळात गच्च वनराईतून ही गाडी जाताना दिसणार आहे.