वृंदावन : येथील वृद्ध आणि विधवा महिलांनी एकत्र येऊन रक्षाबंधन निमित्त पंतप्रधान नरेंद्र  मोदींसाठी दीड हजार  राख्या भेट म्हणून बनवल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीरा सहभगिनी आश्रमातील महिलांनी एकत्र येऊन खास नरेंद्र मोंदींसाठी या राख्या बनवल्या आहेत. नरेंद्र मोंदीच्या रंगीत फोटोंनी या राख्या सजलेल्या आहेत.


आज  देशभरात भावा- बहिणींच्या  प्रेमाचा, अतुट बंधाचा सण म्हणजेच रक्षाबंधन सर्वत्र आनंदाने साजरा केला जात आहे. अशावेळी मीरा सहभगिनी आश्रमातील दहा महिला त्यांनी बनवलेल्या खास राख्या आणि मिठाई मोंदींकडे सुपूर्त करणार आहे.


सुलभ इंटरनेशनलच्या उपाध्यक्ष विनीता वर्मा यांनी सांगितल्यानुसार," पंतप्रधानाच्या निवासस्थानी जाऊन नरेंद्र मोदींच्या हातावर राखी बांधण्याची परवानगी आम्हांला मिळावी याकरिता आम्ही परवानगी मागितली आहे. आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. "