`सोनम वांगचुक` यांनी सांगितला चीनला हरवण्याचा राजमार्ग
वॉलेट पावरचा वापर करा #BoycottMadeInChina
मुंबई : नामांकित मॅगसेसे विजेता सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चीनशी लढण्याच्या एक महत्वाचा मार्ग सांगितला आहे. यूट्यूबवर त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी भारत-चीनच्या सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं आहे. चीनच्या सामानांवर बहिष्कार करण्याचं आवाहन त्यांनी या व्हिडिओतून केलं आहे.
सोनम वांगचुक ही तिच व्यक्ती आहे ज्यांच्या जीवनावर आमीर खानने 'थी इडियट' हा सिनेमा तयार केला आहे. चीन यांनी आपल्या या व्हिडिओत सांगितलं आहे की,'एका आठवड्यात तुम्ही चीनचे सगळे सॉफ्टवेअर काढून टाका. एका आठवड्यात ते स्वतः आपला चायना मेड फोन वापरण बंद करणार आहे.'. या वक्तव्यामागचं कारण देखील सोनम वांगचूक यांनी सांगितलं.
एका बाजूला आपले सैनिक त्यांच्याशी लढत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपली चीनी हार्डवेअर विकत घेतो. टिकटॉक सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करतो. यातून आपण त्यांना करोडो रुपयांचा बिझनेस देतो. ५३ वर्षीय सोनम विचारतात की,'भारत-चीन सीमा तणावाच्या यावेळी एक नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे.'
सोनम यांचा हा व्हिडिओ लडाखमध्ये शूट केलं आहे. ते यावेळी म्हणतात की,मी लडाखमध्ये आहे. तुम्ही सिंधु नदीचा प्रवाह बघू शकता. तुम्ही जो डोंगर बघू शकता. त्यामागे नुब्रा आणि चांगतांगचा परिसर आहे. तिथेच हा सगळा तणाव वाढत चालला आहे.'