Home Loan And Personal Loan: लोकं आपल्या अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. अनेकदा इच्छा नसताना कर्ज घ्यावं लागतं. कधी कधी आपल्या आवडीची वस्तू किंवा घर घेण्यासाठी कर्ज घेतलं जातं. वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळी कर्ज बँकांकडून मिळतात. यामध्ये घर खरेदीसाठी होम लोन (Home Loan), कार-बाइक खरेदीसाठी व्हेईकल लोन (Vehicle Loan), शिक्षण घेण्यासाठी एज्युकेशन लोन (Education Loan) आणि वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन (Personal Loan) घेतलं जातं. पर्सनल लोनमुळे काही अत्यावश्यक गरजा पूर्ण करता येतात. 


Home Loan And Personal Loan


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होम लोनसाठी महत्त्वाच्या दस्ताऐवजांची आवश्यकता असते. तसेच होम लोन हे सर्वात जास्त कालावधीसाठी असतं. 20 ते 25 वर्षे इतका कालावधी असतो. होम लोनची रक्कम जास्त असल्याने ईएमआयची रक्कमही जास्त असते. ईएमआय जास्तीत जास्त कालावधीसाठी असतं. पण होम लोन सुरु असताना पर्सनल लोन घेता येतं का? असा प्रश्न अनेकांना पडतो. जर एखाद्याला होम लोन घेतल्यानंतर पर्सनल लोनची गरज असेल तर तो  पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकतो. तथापि, पर्सनल लोन मिळण्याची किंवा न मिळण्याची शक्यता तुमच्याकडे पर्सनल लोनची परतफेड करण्याची क्षमता आहे की नाही यावर अवलंबून असते.


बातमी वाचा- Term Insurance घेताना कोणत्या टेस्ट आवश्यक? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स


बातमी वाचा- Term Insurance घेताना कोणत्या टेस्ट आवश्यक? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स


होम लोन असताना तुम्ही पर्सनल लोन घेत असाल तर रिपेमेंट करण्याची क्षमता बँककडून चेक केली जाते. जर तुम्ही बँकेचं पर्सनल लोन रिपेमेंट करू शकत नसाल तर अशा स्थितीत पर्सनल लोन बँक देत नाही.